मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव झालायं. या सिरीजमध्ये इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतलीयं. या पराभवामुळे विराट कोहलीची एकाकी झुंज व्यर्थ गेली आहे. ८४ धावा भारताला पुर्ण करायच्या होत्या पण इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजी ढेपाळली.
एजबॅस्टन कसोटीत रंगतदार मुकाबल्यात भारताला इंग्लंडकडून 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पंड्याचा अपवाद वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. कोहलीनं 51 धावांची झुंजार खेळी केली. तर हार्दिक पंड्यानं 31 धावा केल्या. चार बळी घेणारा बेन स्टोक्स इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तर या विजयासह इंग्लंडनं 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 9 ऑगस्टपासून लॉर्ड्समध्ये रंगेल.
विराट कोहलीनं शानदार शतक झळकवलं. कसोटी कारकिर्दीमधलं विराटचं हे २२वं शतक आहे. एकीकडे विराट कोहलीचा संघर्ष सुरु असताना भारतीय टीमची बॅटिंग मात्र गडगडली. कोहली वगळता दुसऱ्या कोणत्याही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. विराट कोहलीच्या शतकामुळे इंग्लंड आणि भारतामधला रनचा फरक कमी झाला आहे.