चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
शिखर धवन या सामन्यात खेळत नसल्याने सलामीवीर म्हणून रोहित शर्मासोबत अजिंक्य रहाणे मैदानात उतरणार आहे. रवींद्र जडेजाला या सामन्यात खेळवण्यात येणार नाही. मनीष पांडेला या सामन्यात संधी देण्यात आलेली नाहीये.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात जेम्स फॉकनर आणि नॅथन कॉल्टर परतलेत. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये त्यांना ९-० अशी धूळ चारल्यानंतर ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी विराट अँड कंपनी सज्ज झालीये.