IPL 2023 Kohli Gambhir Fight : आयपीएलच्या (IPL 2023 ) मैदानात सोमवारी विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचामध्ये जोरदार वादावादी झाली. या वादाचा व्हिडीओ काही वेळात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर दोघांच्या चाहत्यांचा देखील वाद सोशल मीडियावर रंगताना दिसला. विराट आणि गौतममधील वाद हा गेल्या तीन दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. हा वाद काही केल्या थांबताना दिसतं नाही आहे. आता तर वादात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. (#ViratGambhirFight)
या वादात आता पोलिसांची एन्ट्री झाली आहे. लखनऊ (Lucknow Super Giants) आणि बंगळुरु (Royal Challengers Bangalore)चा सामना हा उत्तर प्रदेशातील लखनऊमधील एकना स्टेडियमवर झाला होता. या मैदानावरच गौतम आणि विराटचा वाद झाला. त्यामुळे यूपी पोलिसांना या वादात उडी मारण्याची वेळ आली.
पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट करत म्हटलं आहे की, "कोणतीही समस्या आमच्यासाठी मोठी आणि गंभीर नाही. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब 112 डायल करा."
हे ट्विट करताना त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, "वाद टाळा, आम्हाला कॉल करू नका. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 डायल करा." (IPL 2023 Kohli Gambhir Fight up police tweet on Kohli Gambhir viral video on social media Trending news)
बहस से परहेज़ करें, हमें कॉल करने में नहीं।
किसी भी आपात स्थिति में 112 डायल करें। #DialUP112 pic.twitter.com/5R8Zuqdlt6— UP POLICE (@Uppolice) May 2, 2023
सोमवारी झालेल्या सामन्यादरम्यान अमित मिश्राने विराट कोहलीबद्दल अम्पायरकडे तक्रार केली होती. विराट नवीन उल-हकशी गैरवर्तन करत आहे, अशी माहिती त्याने दिली. त्यानंतर सामना झाल्यानंतर मेयर्स आणि विराटमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. ते पाहून गौतम गंभीरला या वादात हस्तक्षेप करावा लागला. पण हा वाद मिटण्याऐवजी वाढला आणि विराट-गौतममध्ये भांडण झालं. त्यांनी रागाच्या भरात एकमेकांना अनेक गोष्टी बोलल्या.
दरम्यान IPL Governing Council या घटनेची दखल घेत त्या दोघांना कठोर शिक्षा देण्यात आली आहे. विराट आणि गंभीरच्या मॅच फीमध्ये 100 टक्के कपात केली जाणार आहे.