IPL 2024 : आयपीएल 2024 मधील 47 वा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स ह्या दोघं संघात खेळला गेला होता. या सामन्यात केकेआरने उत्कृष्ट कामगिरी करत लखनऊच्या संघाला एकतर्फी सामन्यात 7 विकेट्सने पराभूत केलयं. या विजयासोबतच कोलकाताचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये 12 पॉइंट्ससोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर याच सामन्यामध्ये केकेआरच्या एका खेळाडूवर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी कडक कार्यवाही सुद्धा केली आहे. मॅच सुरू असताना त्याने समोरच्या संघाच्या खेळाडूंना चिडवण्यासाठी चुकीचे हातवारे करत आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आणि या कारणामुळेच त्यावर कडक निर्बंध लादण्यात आले आहे.
कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात अभिषेक पोरेलची विकेट घेतल्यानंतर अभिषेकला बघून फ्लाइंग किस केलं आणि त्याला अनेक हावभाव सुद्धा दाखवले, यामुळे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मॅचनंतर त्याच्याशी चर्चा करून त्यावर कडक निर्बंध लावले आहेत. हर्षित राणावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या 100 टक्के मॅच फिस कापण्याचा दंड लागलाय, यानंतर क्रिकेट कोड ऑफ कंडक्टनुसार हर्षित राणावर अनुच्छेद 2.5 च्या लेवल 1 अनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये, पण एवढच नव्हे तर मॅच फिसचा 100 टक्के दंड लावुन हर्षितवर एका सामन्याची बंदी सुद्धा घातली आहे. यामुळे त्याला केकेआरविरूद्ध मुंबईच्या सामन्यात खेळता येणार नाहीये. पण शेवटी हर्षित राणाने आपली चूक मानली असल्यामुळे, मॅच रेफ्रीनेही त्याची चूक स्विकार केली आहे.
केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर बीसीसीआयने दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर कार्यवाही केली गेलेली आहे. या आधी हर्षितने सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मयंक अग्रवालला आपल्या गोलंदाजीवर आउट केल्यानंतर त्याच्यासमोर फ्लाइंग किसचा इशारा केला होता, तेव्हा पण हर्षित राणाला आपल्या मॅच फिसमधुन 60 टक्के दंड द्यावा लागला होता.
हर्षित राणाने आयपीएल 2024 मध्ये एकूण 8 सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने 9.79 च्या इकॉनॉमीने रन देत 11 विकेट्स घेतल्या आहेत. यावर्षी हर्षित राणा हा केकेआरसाठी आतापर्यंत सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाजसुद्धा बनला आहे. तर आता बघण्यायोग्य असणार की येणाऱ्या मॅचेसमध्ये हर्षित राणाचे प्रदर्शन कसे असणार आणि मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात कोलकाताल्या त्याची किती कमी खलणार आहे?