जसप्रीत बुमराहकडून ईशान किशन ट्रोल, पाहा व्हिडीओ

'अरे याला मसल्स नाहीत तर....' बुमराहने उडवली ईशानची खिल्ली, पाहा व्हिडीओ   

Updated: Apr 9, 2022, 04:10 PM IST
जसप्रीत बुमराहकडून ईशान किशन ट्रोल, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : कोलकाता विरुद्धचा सामना पराभूत झाल्यानंतर मुंबईच्या टीममधील क्रिकेटपटूंचं मनोबल खचलं होतं. आता बंगळुरू विरुद्ध पहिल्यांचा जिंकण्यासाठी मुंबई टीमने कंबर कसली आहे. आतापर्यंत मुंबई टीमला पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरू विरुद्ध जिंकण्यासाठी मुंबई टीम सज्ज आहे. 

रोहित शर्मा आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवत आहे. फोटो सेशन दरम्यान ईशान आपले मसल्स दाखवत होता. तो आपले दंड थोपटून दाखवत असताना बुमराहने त्याची मस्करी केली. तो दंड थोपटवत असताना त्याची खिल्ली उडवली आणि एकच हशा पिकला. 

बुमराह म्हणाला की हे मसल्स नाहीत तर जाडं म्हणतात याला असं म्हणत बुमराहने ईशानची मस्करी केली. बुमराहच्या या जोकवर  सगळेजण हसायला लागले. हे मसल्स नाही तर बॉडी फॅट आहे. यावेळी रोहितची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा उपस्थित होते. 

ईशान किशन सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तीन सामन्यांमध्ये 149 धावा केल्या आहेत. त्याने दिल्ली विरुद्ध सामन्यात नाबाद 81 धावा केल्या. बुमराहला मात्र म्हणावं तेवढं यंदाच्या हंगामात यश मिळालं नाही. तीन सामन्यात त्याला विकेटसाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे.