Ken Block death : इथे भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या (Rishabh pant Accident) अपघाताची बातमी चर्चेतून जात नाही तोच क्रीडाजगताला हादरा देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी वाचून अनेकांना धक्काच बसत आहे. कारण, या अपघातामध्ये जागतिक स्तरावर नावाजलेल्या एका खेळाडूचा मृत्यू ओढावला आहे. Action, Adventure Sports विश्वातील एक मोठं नाव, डीसी शूजचे सह- संस्थापक केन ब्लॉक (Ken Block Acccident ) यांचं अमेरिकेतील (America) त्यांच्या निवासस्थानानजीक असणाऱ्या युटा येथे स्नोमोबाईल अपघातात निधन झालं.
केनेथ पॉल हे एक Pro Rally Driver होते. स्नोबोर्डिंग (Snow boarding), एटीव्ही यांसारख्या थरारक खेळांसोबतच ते आणखी एका कारणासाठीही ओळखले जात होते. ते कारण म्हणजे त्यांची 'जिमखाना' (ken block gymkhana) ही व्हिडीओ सीरिज. ऑडी (Audi) या मोठ्या ब्रँडसोबत असणाऱ्या करारानंतर त्यांनी कंपनीच्या इलेक्ट्रिक कार्स आणि पोर्शच्या सहाय्यानं काही साहसी व्हिडीओही तयार केल्या होत्या. निधनाच्या काही तासांपूर्वीच केन यांनी सोशल मीडियावर काही फोटो स्टेटसमध्ये ठेवले होते. अनेक फॉलोअर्स त्यावर व्यक्तही झाले. पण, पुढे नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं.
युटा येथील सरकारी कार्यालयाकडून केन यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सोबतच अधिकृत पत्रकही जारी करण्यात आलं. '2 जानेवारी 2023 ला साधारण 2 वाजण्याच्या सुमारास वॉशेज काऊंटी 911 केंद्रालगत असणाऱ्या मिल हॉलो क्षेत्रात एका स्नोमोबाईल अपघाताची घटना घडली. सदरील माहिती देणारा एक फोन आला. ज्यानंतर बचाव आणि शोध पथकानं तातडीनं प्रतिसाद दिला. यावेळी केनेथ ब्लॉक हे एका चढावर स्मोमोबाईल चालवत होते त्याचवेळी तो त्यांच्यावर कोसळला. दुर्घटनेमुळे ते गंभीररित्या जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सदर प्रसंगी त्यांच्यासोबत कुणीही नव्हतं', असं शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीत म्हटलं गेलं.
(snowmobile) स्नोमोबाईलला स्की-डू असंही म्हणतात. सोप्या शब्दांत सांगावं तर ही असते एक प्रकारची स्नो स्कूटर. ही एक अशा प्रकारची स्कूटर आहे, जी अतीप्रचंड थंडी आणि हिमच्छादित प्रदेशांमध्ये उत्तमरित्या चालू शकते. बर्फावर चालणाऱ्या या स्कूटरचा तसा डांबरी रस्त्यांवरील वावर शून्य. कारण, तिची आखणीच त्या पद्धतीनं केलेली असते. स्नोमोबाईल चालवणं हा छंद परदेशात अनेकजण जोपासतात. या छंदाप्रती असणारी अनेकांची आवड पाहता त्याला खेळाचंही स्वरुप प्राप्त आहे.