Yashasvi Jaiswal: "मला आई बहिणींवरून शिव्या दिल्या तर..."; टीम इंडियामध्ये येताच यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला!

Yashasvi Jaiswal, India vs West Indies: कोणी जर मला आई-बहिणींवरून शिव्या दिल्या किंवा स्लेजिंग केले तर ते मी खपवून घेणार नाही, असंही यशस्वी जयस्वाल म्हणालाय. त्यामुळे खेळताना सर्वांनी मर्यादेचं पालन करायला हवं, असं मत जयस्वालने मांडलं आहे.

Updated: Jul 1, 2023, 06:33 PM IST
Yashasvi Jaiswal: "मला आई बहिणींवरून शिव्या दिल्या तर..."; टीम इंडियामध्ये येताच यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला! title=
Yashasvi Jaiswal On sledging, India vs West Indies

Yashasvi Jaiswal On Sledging: सर्वांना 2022 साली झालेला पश्चिम आणि दक्षिण विभागातील सामना आठवत असेल. दक्षिण विभागाचा रवी तेजा आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात वाद झाला. त्यावेळी यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने रवी तेजा याची स्लेजिंग सुरू केली. त्यावेळी कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने यशस्वी जयस्वालची मैदानातून हकालपट्टी केली होती. त्यावेळी अनेकांनी अजिंक्य रहाणेचं कौतूक केलं होतं .यशस्वी सारखाच रवी तेजावर स्लेजिंग करत होता. ही गोष्ट अजिंकच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्याच खेळाडूवर कठोर कारवाई केली होती. अशातच आता याच यशस्वी जयस्वालने स्लेजिंगवर (Yashasvi Jaiswal On Sledging) एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला यशस्वी जयस्वाल?

क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमकता पहायला मिळते आणि काही प्रमाणात खेळात आक्रमकता असायला हवी. मात्र, प्रत्येकाने मर्यादित रहायला हवं, असं यशस्वी जयस्वाल म्हणाला आहे. क्रिकेटमध्ये स्लेजिंग होत असते. पण कोणी जर मला आई-बहिणींवरून शिव्या दिल्या किंवा स्लेजिंग केले तर ते मी खपवून घेणार नाही, असंही तो म्हणालाय. त्यामुळे खेळताना सर्वांनी मर्यादेचं पालन करायला हवं, असं मत जयस्वालने मांडलं आहे.

आयपीएलमध्ये धमाकेदार शतक ठोकल्यानंतर आता यशस्वी जयस्वालची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (India vs West Indies) भारतीय संघात निवड झाली आहे. जयस्वालने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना 14 सामन्यांमध्ये 48.08 च्या सरासरीने आणि 163.61 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या होत्या. त्याने 5 अर्धशतक तर 1 खणखणीत शतक देखील ठोकलं होतं. त्यामुळे आता यशस्वी जयस्वाल वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी सामन्यात कशी कामगिरी करणार? यशस्वी प्लेईंग इलेव्हनसाठी जागा मिळवू शकेल का? असा सवाल विचारला जातोय.

Yashasvi Jaiswal: लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडला!

दरम्यान, माझ्या वडिलांना जेव्हा कळालं की माझी टीम इंडियामध्ये निवड झालीये, तेव्हा ते ढसाढसा रडू लागले. गुडन्यूज ऐकल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला मुलगा आता भारतासाठी खेळणार याचा त्यांना आनंद झाला होता. मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज झालं, असं त्यांना वाटत होतं, असं म्हणताना यशस्वी जयस्वाल भावूक झाल्याचं दिसून आलं होतं. 

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.