Pakistan vs Bangladesh 1st Test : आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी आता सर्व संघ जोर लावताना दिसत आहे. अशातच आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जातीये. बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना रावलपिंडीच्या स्टेडियमवर खेळवला जात आहे. अशातच आता सामन्याचा पहिलाच दिवस वादग्रस्त ठरला आहे. अंपायरच्या एका निर्णयावरून मोठा वाद उभा राहिल्याचं चित्र पहायला मिळालं. नेमकं प्रकरण काय होतं? पाहा घटनेचा संपूर्ण व्हिडीओ..
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशीरा सुरू झाला होता. पावसामुळे गोलंदाजांना मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. सामन्याच्या चौथ्याच ओव्हरमध्ये अब्दुल्ला शफीकने विकेट गमावली. तो केवळ 2 धावा करून बाद झाला. पाकिस्तानला आता सावध खेळण्याची गरज होती. त्याचवेळी 7 व्या ओव्हरमध्ये शान मसूद बाद झाला. अंपायरने दिलेल्या एका निर्णयावरून वाद सुरू झालाय. शोरिफुल इस्लामने शान मसूदची विकेट घेतली. मसूदच्या बॅटला बॉल टच झाला अन् विकेटकिपरने कॅच घेतला. ऑन फिल्ड अंपायरने याला नॉट आऊट घोषित केलं. त्यानंतर बांगलादेशच्या कॅप्टनने रिव्ह्यू घेतला अन् थर्ड अंपायरने धक्कादायक निर्णय दिला.
थर्ड अंपायरने शान मसूदला बाद म्हणून जाहीर केलं. रिव्ह्यू सिस्टिमध्ये शानच्या पॅडला बॉल लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. तरी देखील शानला बाद जाहीर केल्याने पाकिस्तानचा संघाने संताप व्यक्त केला. तर ड्रेसिंग रुममध्ये परतल्यावर शान मसूदचे हावभाव नाराज असल्याचे दिसत होते. तर बाबर आझम देखील नाखूश असल्याचं दिसत होतं. यावर आता सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. काहींनी अंपायर्सचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी निर्णयावर आक्षेप घेतलाय. त्यामुळे व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा..
Out or not out
Shan Masood is dismissed by Shoriful Islam.#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/8OgkgQKHPa
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 21, 2024