कराची : पाकिस्तानचा माजी कप्तान शाहीद आफ्रिदीने नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य किंवा ट्रोलिंगमुळे चर्चेत असतो. क्रिकेटच्या मैदानात त्याचे गौतम गंभीरसह अनेक भारतीय खेळाडुंशी वाद झाले आहेत. काश्मीर मुद्द्यावरुन शाहीदने नेहमी आक्रमक भुमिका घेतली आहे. यावरुन देखील त्याला भारतीयांच्या रोषाला सामोरं जात असतो. सध्या पाकिस्तानच्याच माजी क्रिकेटपट्टूने केलेल्या आरोपामुळे आफ्रीदी पुन्हा चर्चेत आलाय.
शाहीद आफ्रीदीची कॅप्टन्सीमध्ये खेळताना माझ्यासोबत भेदभाव झाल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी स्पिनर दानिश कानेरीयाने केलाय. मला टीम बाहेर फेकण्यातही आफ्रीदीचा हात असल्याचे दानिशने सांगितले.
मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली दानिशवर बंदी आहे. त्याने हे आरोप मान्य केले आहेत. धर्माच्या आधारवर दानिशसोबत पाकिस्तानी टीममध्ये भेदभाव व्हायचा असा आरोप पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला होता. शोएबने गेल्यावर्षी केलेल्या या आरोपानंतर त्या खेळाडुंची नाव सांगू असे कानेरियाने म्हटले होते. शोएब पूर्ण खरं बोलल्याचे दानिशने सांगितले.
मी इंजमाम उल हक यांच्या कॅप्टन्सीखाली ३ वर्षे खेळलो. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. नंतर युनूस खानच्या कॅप्टन्सीखाली भारत दौऱ्यावर आलो. त्यांनी देखील कधी भेदभाव केला नाही. ते नेहमी सर्वांना सहकार्य करायचे. पण आफ्रिदी नेहमी माझ्या विरोधात असायचा. मी ६१ टेस्ट आणि १६ वनडे खेळलोय. दरवर्षी मला २ किंवा ३ वनडे खेळायला मिळायच्या असे देखील त्याने म्हटले.
जगभरात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरचा राग आळवला आहे. सोशल मीडियावर आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मिरी जनतेवर अत्याचार करत आहेत, त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. नरेंद्र मोदी धर्माचं राजकारण करत आहेत, अशी टीका आफ्रिदीने व्हिडिओमध्ये केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने शाहिद आफ्रिदीला प्रत्युत्तर दिलं आहे.