Ravi Shastri On Hardik Pandya: मागल्या वर्षाप्रमाणे यंदाही आयपीएल 2023 च्या हंगामात गुजरात टायटन्सचा संघ धडाकेबाज कामगिरी करताना दिसतोय. आत्तापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमध्ये गुजरातने सर्वाधिक पॉईंट्स नावावर केले आहेत. अंकतालिकेत गुजरातने 16 गुणांसह अव्वल स्थान गाठलंय. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कोच आशिष नेहरा यांच्या परफेक्ट प्लॅनवर संपूर्ण संघ खरा उतरतोय. अशातच टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी हार्दिक पांड्याचं तोंडभरून कौतूक केलंय.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T-20 World Cup 2024) जवळ येत आहे आणि सध्याच्या तरुणांमध्ये भरपूर टॅलेंट आहे, यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्याला काही उत्तम टॅलेंट पहायला मिळाली. हा पूर्णपणे नवीन संघ नसून त्यात अनेक नवे चेहरे असतील. हार्दिक पांड्या आधीच या फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे. फिटनेसची समस्या नसल्यास पांड्या संघाचं नेतृत्व करत राहील. 2007 च्या विश्वचषकासारख्या आगामी स्पर्धेत युवा खेळाडूंना संधी मिळेल, अशी आशा देखील रवी शास्त्री (Ravi Shastri On Hardik Pandya) यांनी व्यक्त केली आहे.
सध्या हार्दिकवर वर्कलोड मॅनेजमेंटची कोणतीही समस्या नाही. तो कसोटी खेळत नसल्याने त्याला कसोटी मालिकेदरम्यान विश्रांतीची संधी मिळेल. आयपीएल आणि वनडे वर्ल्ड कप वगळला तर मोठे सामने टीम इंडिया (Team India) खेळणार नाही, असंही शास्त्री यावेळी म्हणाले आहेत.
आणखी वाचा - IPL 2023: ...तर मी आज जिवंत नसतो; Mohammed Siraj ने सांगितला धक्कादायक किस्सा!
दरम्यान, टीम इंडियाकडे प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. संघ व्यवस्थापन खेळाडूंमधील प्रतिभा शोधतील आणि त्यांच्याकडे पर्यायांची कमतरता राहणार नाही. आयपीएल (IPL 2023) संघांचे कर्णधारपद भूषवलेल्या खेळाडूंसाठीही एक पर्याय असेल, असं म्हणत त्यांनी संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रवी शास्त्री यांनी वनडे वर्ल्ड कपवर मोठं वक्तव्य केलं होतं. मर्यादित षटकांमधील वनडे सामन्यात ओव्हरची मर्यादा कमी करण्याची गरज असल्याचं मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलं होतं. आता 40 ओव्हरचा खेळ होण्याची वेळ आली आहे. काळाबरोबर गोष्टी विकसित होतात. क्रिकेटचं हे स्वरूप कमी करण्याची गरज आहे, असं मत रवी शास्त्री यांनी (Ravi Shastri On ODI World Cup) मांडलं होतं. त्यानंतर आता त्यांनी मोठी भविष्यवाणी केलीये.