Ind Vs Eng 5th Test: इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत ऋषभ पंतची बॅट चांगलीच तळपली. पहिल्या डावात शतकी खेळी केल्यानंतर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. या खेळीसह ऋषभ पंतने बर्मिंगममध्ये नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पाहुण्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. 1950 मध्ये वेस्टइंडिजच्या क्लाइड वालकॉटच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे. वॉलकॉटने लॉर्ड्स कसोटीत नाबाद 14 आणि 168 धावांची खेळी केली होती. वॉलकॉटने एकूण 182 धावा केल्या होत्या.
पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी 36 धावा करताच पंतने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पंतने पहिल्या डावात धडाकेबाज शतक झळकावताना 146 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावातही त्यांनी अर्धशतक झळकले. दुसऱ्या डावात पंतने 57 धावांची खेळी केली. अशा प्रकारे पंतने कसोटी सामन्यात 200 हून अधिक धावा केल्या. पहिल्या डावात भारतीय संघाची धावसंख्या 400 च्या पार नेण्यात पंतचा मोलाचा वाटा होता.
That's another half-century for @RishabhPant17 #TeamIndia now leads by 316 runs.
Live - https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/xXA2WLJcHF
— BCCI (@BCCI) July 4, 2022
2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत एमएस धोनीच्या 151 धावसंख्येलाही पंतने मागे टाकले आहे. भारताच्या माजी कर्णधाराने दोन डावात नाबाद 77 आणि 74 धावा केल्या होत्या. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.