Arjun Tendulkar GT vs MI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai indians) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्या सामना रंगला आहे. यावेळी मुंबईने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात चाहत्यांचं रोहित शर्माच्या एका निर्यणयाकडे लक्ष होते. हा निर्णय म्हणजे रोहित अर्जुनचा टीममध्ये समावेश करतो का नाही. पंजाबविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने अर्जुनचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केलाय.
दरम्यान अर्जुनला गुजरातविरूद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी दिल्यामुळे आता अनेकांनी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यावर टीका केली आहे. याचं कारण म्हणजे रोहित शर्मा हा हार्दिक पंड्यासारखा वागला नाही. रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांमध्ये खूप तफावत आहे.
पंजाबविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने त्याच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर विकेट काढली. मात्र ही विकेट काढल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाजांची त्याची चांगलीच धुलाई केली. पंजाबविरूद्धच्या 16 व्या ओव्हरमध्ये अर्जुनने तब्बल 31 रन्स दिले. अर्जुनच्या या ओव्हरची स्पेल 6, Wd, 4, 1, 4, 6, N4, 4 अशी होती. यावेळी अर्जुनवर टीकाही करण्यात आली.
यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न होता की, गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात अर्जुनला संधी मिळणार की नाही. मात्र अर्जुनला या सामन्यामध्ये संधी दिली आणि रोहित शर्माने दाखवून दिलं की, को इतरांपेक्षा किती वेगळा कर्णधार आहे.
यंदाच्या सिझनमधील रिंकू सिंहची फलंदाजी प्रत्येकाच्याच लक्षात असेल. केकेआरविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या टीमने यश दयालला शेवटच्या ओव्हरची धुरा दिली होती. त्यावेळी यश दयालच्या या ओव्हरमध्ये रिंकू सिंगने पाच सिक्स लगावेल आणि सामना देखील जिंकूला. दरम्यान त्या सामन्यानंतर पुढच्या कोणत्याच सामन्यामध्ये यश दयालला संधी देण्यात आली नाही. दरम्यान रोहित शर्माही अर्जुनबाबत असंच करेल असा विचार अनेकांच्या मनात आला. मात्र रोहितने अर्जुनवर विश्वास ठेवत त्याला टीममध्ये जागा दिली.