मुंबई : रॉयल चॅलेंजर बंगळूरूने यंदाच्या आयपीएलमधील दुसरा विजय नोंदवला आहे. पॉईंट्स टेबलवर टॉपवर असलेल्या राजस्थान रॉयल्सचा कालच्या सामन्यात 4 विकेट्सने आरसीबीने पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सचा हा पहिला पराभव असल्याने कर्णधार संजू सॅमसन चांगलाच निराश झाला आहे. यावेळी सामन्यानंतर त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दिनेश कार्तिक आणि शाहबाज अहमद या दोघांच्या 67 रन्सच्या पार्टनरशिपच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बंगळूरूने राजस्थानवर विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 169 रन्स केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळूरूच्या टीमने 19.1 ओव्हरमध्येच हे लक्ष्य पूर्ण केलं.
दरम्यान सामना हरल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने विचित्र रिएक्शन दिलं. यावेळी संतप्त प्रतिक्रिया देत, मला माहिती नाही सामना कधी आमच्या हातून गेला, असं वक्तव्य केलं आहे.
सॅमसन म्हणाला, सामना नेमका कधी आमच्या हातून निसटला तो क्षण मी नाही सांगू शकत. मात्र टॉस हरूनही आमच्या टीमने हा स्कोर बनवण्यासाठी चांगला प्रयत्न केला होता. आम्ही उभारलेला स्कोर चांगला होता. सामन्यामध्ये अनेक गोष्टी सकारात्मक झाल्या आणि त्यापासून आम्ही खूप काही शिकू शकतो.
एकेकाळी राजस्थान रॉयल्सची टीम सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत होती. पण ‘प्लेअर ऑफ द मॅच’ दिनेश कार्तिकने 44 आणि शाहबाज अहमदच्या 45 खेळीच्या जोरावर टीमला विजय मिळवून दिला.