SL VS NZ Test : श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. या सीरिजमधील दुसरा सामना गॉल येथे खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडवर 154 धावांनी विजय मिळवला. सामन्यात न्यूझीलंडची टीम फॉलोऑन खेळताना चौथ्या दिवशी 360 धावांवर ऑल आउट झाली. यासह श्रीलंकेने न्यूझीलंडला क्लीन स्वीप देऊन टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
श्रीलंकेने टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला 63 धावांनी हरवलं. तर दुसऱ्या सामन्यातही त्यांना क्लीन स्वीप देऊन श्रीलंकेने 15 वर्षानंतर न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकली. यापूर्वी 2009 मध्ये श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली होती. हा विजय श्रीलंकेचा सर्वात मोठा टेस्ट विजय देखील होता. दुसऱ्या टेस्ट सीरिजमध्ये श्रीलंकेच्या डाव्या हाताचा गोलंदाज निशाण पेइरिस याने 6 विकेट्स घेतले. निशाण पेइरिसचा हा डेब्यू टेस्ट सामना होता. त्यांनी पहिल्या इनिंगमध्येही तीन विकेट्स घेतले होते. न्यूझीलंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 78 तर मिचेल सेंटनर 67 आणि डेवोन कॉन्वे याने 61 धावा केल्या.
हेही वाचा : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? नावं आली समोर
श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स गमावून 602 धावा केल्या. श्रीलंकेच्या कामिंदु मेंडिसने यात 182, दिनेश चांदीमलने 116 तर कुसल मेंडिसने 149 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडचा गोलंदाज ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक दोन विकेट्स घेतले. प्रभात जयसूर्या आणि निशान पेरिस या फिरकीपटूंनी मिळून न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 88 धावांत ऑल आउट केले. म्हणजेच पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेला 514 धावांची आघाडी मिळाली. मिचेल सँटनरने सर्वाधिक 29 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने 6 आणि पेरीसने तीन विकेट घेतल्या.
श्रीलंका : पहिली इनिंग - 5 विकेट वर 602 धावा
न्यूझीलंड : पहिली इनिंग - 88 धावा, दूसरी इनिंग - 360 धावा