राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार, 2 खेळाडूंना खेळरत्न

क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामधील सर्वात मोठा सन्मान बॅडमिंटनची स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना जाहीर झाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीलाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 20, 2023, 05:13 PM IST
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार, 2 खेळाडूंना खेळरत्न title=

यावर्षीच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामधील सर्वात मोठा सन्मान बॅडमिंटनची स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना जाहीर झाला आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीलाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. 9 जानेवारी 2024 रोजी या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील. 

26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

क्रीडा मंत्रालयानुसार, यावेळी मोहम्मद शमीसह एकूण 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित केलं जाईल. आपल्या खेळात केलेल्या भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. 

क्रीडा मंत्रालयाने सांगितलं आहे की, समितींनी केलेल्या शिफारशीनंतर आणि सरकारने योग्य तपासणी केल्यानंतर हे सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची निवड करण्यात आली आहे. मंत्रालयाने पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांची यादी जाहीर केली आहे. 

 

पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी

खेळरत्न पुरस्कार 

चिराग शेट्टी   -  बॅडमिंटन
सात्विकसाईराज रंकीरेड्डी     -  बॅडमिंटन

अर्जुन पुरस्कार 

ओजस प्रवीण देवताले   -   तिरंदाजी
अदिति गोपीचंद स्वामी   -   तिरंदाजी
श्रीशंकर    -   अॅथलेटिक्स
पारुल चौधरी   -   अॅथलेटिक्स
मोहम्मद हुसामुद्दीन    -   बॉक्सर
आर वैशाली    -   बुद्धिबळ
मोहम्मद शमी   -   क्रिकेट
अनुश अग्रवाल   -   घोडेस्वारी
दिव्यकृति सिंह   -   घोडेस्वारी ड्रेसेज
दीक्षा डागर   -   गोल्फ
कृष्ण बहादुर पाठक   -   हॉकी
सुशीला चानु   -   हॉकी
पवन कुमार   -   कबड्डी
रितु नेगी   -   कबड्डी
नसरीन   -   खो-खो
पिंकी    -   लॉन बॉल्स
ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर    -   शूटिंग
ईशा सिंह   -   शूटिंग
हरिंदर पाल सिंह    -   स्क्वॅश
अयहिका मुखर्जी    -   टेबल टेनिस
सुनील कुमार    -   कुस्ती
अंतिम    -   कुस्ती
रोशीबिना देवी    -   वुशू
शीतल देवी    -   पैरा आर्चरी
अजय कुमार    -   ब्लाइंड क्रिकेट
प्राची यादव    -   पैरा कैनोइंग