T20 world cup 2022: भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एका खेळाडूबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Team India 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे, ज्याच्या जोरावर त्यांनी उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. T20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाची कामगिरी चांगली असताना माजी कर्णधार कपिल देव भारतीय संघातील खेळाडूच्या कामगिरीवर अजिबात खूश नाहीत. त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कपिल देव यांनी या खेळाडूच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे.
भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांच्या मते ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ही टीम इंडियाची सर्वात मोठी कमजोरी ठरला आहे. आता रविचंद्रन अश्विनलाही विकेट मिळत नाहीत. त्यामुळे या ऑफस्पिन गोलंदाजाला स्वतःची लाज वाटली पाहिजे, असेही कपिल देव म्हणाले. एका खासगी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल देव यांनी रविचंद्रन अश्विन यांच्यावर सडकून टीका केली आहे.
रविवारी झालेल्या T20 विश्वचषक 2022 च्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने (R Ashwin)झिम्बाब्वे विरुद्ध 4 षटकात 22 धावा देऊन 3 बळी घेतले. या कामगिरीबद्दल कपिल देव यांनी रविचंद्रन अश्विन याची खिल्ली उडवली. कपिल देव म्हणाले, 'आतापर्यंत मी रविचंद्रन अश्विनमध्ये आत्मविश्वासासारखी कोणतीही गोष्ट पाहिलेली नाही. अश्विनने विकेट घेतल्या तरी या विकेट्स मिळाल्या असे वाटले नाही.
कपिल देव म्हणाले, 'प्रत्यक्षात झिम्बाब्वेचे फलंदाज अशा प्रकारे आऊट झाले की अश्विनलाच विकेट घेण्याची लाज वाटली आणि तो तोंड लपवत होता. विकेट्स घेतल्याने तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो, पण आम्हांला माहीत असलेला अश्विन सध्या तो तसा दिसत नाही.