T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरुवात होत आहे. या स्पर्धेत यंदा 20 संघांनी भाग घेतला आहे. सहभागी संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेसाठी रवाना होऊ लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघही (Team India) लवकरच न्यूयॉर्कला रवाना होणारअसून याची तारीख समोर आली आहे. आधी ठरल्याप्रमाणे टीम इंडियातल्या खेळाडूंना 21 मे रोजी न्यूयॉर्कला जायचं होतं. पण आता नव्या तारखेनुसार पहिल्या टप्प्यात टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी न्यूयॉर्कला (New York) रवाना होतील. आपीएलच्या प्लेऑफमध्ये जे भारतीय खेळाडू खेळणार आहेत, ते दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 27 मे रोजी रवाना होतील.
25 मे रोजी रवाना होणार
आयपीएलच्या लीग (IPL 2024) सामन्यातच ज्या संघांचा प्रवास संपला, त्या संघातील भारतीय खेळाडू 25 मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होतील. यात कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि सपोर्ट स्टाफचा समावेश असेल.
तर यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज हे आयपीएल अंतिम फेरीनंतर म्हणजे 26 मे नंतर न्यूयॉर्कला पोहोचतील.
टीम इंडिया खेळणार एक प्रॅक्टिस मॅच
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. त्याआधी टीम इंडिया एक प्रॅक्टिस मॅच खेळणार आहे. 1 जूनला भारत आणि बांगलादेशदरम्यान एक प्रॅक्टिस मॅच खेळवली जाईल. त्यानंतर तीन दिवस खेळाडूंना विश्रांती करता येईल.
टीम इंडियाचं वेळापत्रक
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 9 जूनला भारत आणि पाकिस्तान आमने सामने असतील. 12 जूनला टीम इंडिया अमेरिकेशी तर 15 जूनला कॅनडाशी दोन हात करेल. टीम इंडियाचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
टी20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप-कप्तान), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान