मुंबई : अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपला उद्यापासून न्यूझीलंडमध्ये सुरुवात होणार आहे. एकूण १५ टीम्स या वर्ल्ड कपमध्ये हिस्सा घेणार आहेत. विराट कोहलीपासून ते स्टीव्ह स्मिथसारखे दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू अंडर १९ वर्ल्ड कपमधूनच नावारुपाला आले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपची लोकप्रियता वाढत चालली आहे.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचनं यंदाच्या अंडर १९ वर्ल्ड कपला सुरुवात होईल. तर ३ फेब्रुवारीला वर्ल्ड कपची फायनल होईल. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारतीय टीम हा वर्ल्ड कप खेळणार आहे. राहुल द्रविड हा भारतीय टीमचा प्रशिक्षक आहे. उद्यापासून अंडर १९ वर्ल्ड कपला सुरुवात होत असली तरी १४ तारखेला भारताचा पहिला सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचपासून भारताच्या वर्ल्ड कप कॅम्पेनला सुरुवात होईल.
१४ जानेवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- सकाळी ६.३० वाजता(भारतीय वेळेनुसार)
१६ जानेवारी- भारत विरुद्ध पपुआ न्यू गिनी- सकाळी ६.३० वाजता(भारतीय वेळेनुसार)
१९ जानेवारी- भारत विरुद्ध झिम्बाब्वे- सकाळी ६.३० वाजता(भारतीय वेळेनुसार)