शतकवीर विराट आणि स्मृतीमध्ये हे साम्य....

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील क्रिकेट सिरीजमध्ये भारताने ३-० ने आघाडी घेतली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 8, 2018, 06:46 PM IST
शतकवीर विराट आणि स्मृतीमध्ये हे साम्य.... title=

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील क्रिकेट सिरीजमध्ये भारताने ३-० ने आघाडी घेतली.  सलग तिसरा विजय भारताने आपल्या नावे करत अनेकांची मने जिंकली. 

महिला संघाचाही विजय

सध्या महिला आणि पुरूष अशा दोन्ही क्रिकेट टीम आफ्रिकेत एकदिवसीय मालिका खेळत आहेत. महिलांच्या क्रिकेट टीमने ही २-० ने आघाडी घेतली आहे. या सिरीजमधील तिसरा सामना शनिवारी रंगणार आहे.

शतकामागे हा योगायोग

पण या दोन्ही सिरीजमधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुधवारी महिला व पुरूष दोन्ही भारतीय संघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला. यात भारतीय खेळाडूंचं शतक महत्त्वाचं ठरलं. एकीकडे विराट कोहलीने १६० रन्स केले कर महिला टीममधील स्मृती मानधनाने १३५ रन्सची बाजी मारली. या दोघांची खास गोष्ट म्हणजे दोन्ही खेळाडूंचा जर्सी नंबर १८ आहे. म्हणजे १८ नंबरच्या जर्सीची ही कमाल भारतासाठी यशस्वी ठरली आहे.