Rohit Sharma On Virat Kohli: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशाविरूद्ध वॉर्म अप सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने 60 रन्सने विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीच्या क्रमामध्ये काही बदल करून पाहिले. या सामन्यामध्ये सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा किंग विराट कोहलीकडे होत्या. परंतु या सामन्यात विराटचा समावेश नव्हता. विराटच्या अनुपस्थितीवर रोहित शर्माने भाष्य केलं आहे.
न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली या सामन्यामध्य अनुपस्थित होता. विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याबद्दल अटकळ बांधली जात होती, मात्र आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीबाबत वक्तव्य केलं. रोहित शर्माने सांगितलं की विराट कोहली प्लेइंग इलेव्हनचा भाग का नाही?
बांगलादेशविरूद्धचा वॉर्म अप सामना टीम इंडियाने 60 रन्सने जिंकला. या सामन्यात टॉस वेळी रोहित शर्माने सांगितले की, "विराट कोहली शुक्रवारी न्यूयॉर्कला पोहोचला आहे. त्यामुळे विराटला विश्रांती देण्यात आली आहे. याच कारणामुळे तो वॉर्म अप सामना खेळू शकला नाही." वॉर्म अप सामना सुरु होण्यापूर्वीच रोहितने विराटच्या खेळण्याबाबत अपडेट दिले होते.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विराट कोहली तंदुरुस्त नसल्याचा अंदाज लावला जात होता. त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नसू शकतो. अशी अटकळ बांधळण्यात येत होती. मात्र आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हे सर्व अंदाज फेटाळून लावले आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपच्या आगामी सामन्यांमध्ये विराट कोहली टीम इंडियाच्या प्लेईंग 11 चा भाग असणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 182 रन्स केले होते. यावेळी बांगलादेशाच्या टीमला प्रत्युत्तरात 122 रन्स करता आले. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने अर्धशतक झळकावलं. यावेळी त्याने 53 रन्सची उत्तम खेळी केली. याशिवाय हार्दिक पांड्याने 23 चेंडूत 40 रन्स केले. ज्यामध्ये 2 फोर आणि चार सिक्स लगावले. अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी भारतीय टीमकडून चांगली कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. अर्शदीपने तीन ओव्हर्समध्ये केवळ 12 रन्स दिले.