World Cup 2023 Virat Kholi Enemy Selected In Team: भारतामध्ये 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून या स्पर्धेसाठी सर्वच देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. या संघांमध्ये बदल करण्याची संधी 27 सप्टेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे. अफगाणिस्तानने आपल्या 15 खेळाडूंच्या यादीमध्ये भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीशी काहीही कारणं नसताना शत्रूत्व घेणाऱ्या एका खेळाडूचा समावेश केला आहे. तब्बल 2 वर्षांनी या खेळाडूला राष्ट्रीय संघांमध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेमध्येही या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्यात आली नव्हती. मात्र विश्वचषकाच्या संघात निवड झाल्याने या खेळाडूची एकाप्रकारे लॉटरीच लागली आहे.
अफगाणिस्तानने 15 खेळाडूंचा संघ जाहीर करताना हशमतुल्लाह शाहिदीकडे कर्णधारपद सोपवलं आहे. तसेच या संघामध्ये नवीन-उल-हकलाही स्थान देण्यात आलं आहे. तसेच 23 वर्षीय अष्टपैलू खेळाडू अजमतुल्लाह उमरजईचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तो सुद्धा आशिया चषक स्पर्धेसाठी संघात नव्हता. नवीन-उल-हक याला तर तब्बल 2 वर्षांनी राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. वरिष्ठ सदस्य आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या गुलबदीन नईबने आशिया चषकात उत्तम कामगिरी करुनही त्याला संधी देण्यात आलेली नाही. अजमतुल्लाह उमरजईच्या नेतृत्वाखालील आशिया चषकासाठी निवडलेल्या संघामध्ये एकूण 4 बदल करण्यात आले आहेत. नईब नायबबरोबरच करीम जनत, शराफुद्दीन अशरफ आणि सुलेमान सफीसारख्या खेळाडूंनाही संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
नवीन-उल-हक हा तोच खेळाडू आहे ज्याच्यामुळे विराट कोहली आणि गौतम गंभीरदरम्यान यंदाच्या म्हणजेच 2023 च्या एका सामन्यानंतर मैदानात वाद झाला होता. विराट कोहली आणि नवीन-उल-हकदरम्यान मैदानात मोठा वाद चांगलाच चर्चेत आला होता. इतकेच नाही तर सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना विराट कोहलीचा हात नवीन-उल-हकने झटकला. यावरुन विराटने नीवन-उल-हकला तिथेच झापलं. नंतर या वादात गौतम गंभीरने नवीन-उल-हकची बाजू घेत विराटशी वाद घातला.बरं हा वाद केवळ मैदानापुरता राहिला नाही तर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले.
नवीन-उल-हक यानंतर संपूर्ण स्पर्धेदरम्यान खोचक पोस्टच्या माध्यमातून विराट कोहली आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध टीप्पण्या करत राहिला. कधी आरसीबी पराभूत झाल्यानंतर आंबे गोड असल्याची इन्स्टाग्राम स्टोरी तर कधी आरबीसी पराभूत झाल्यानंतर हसणारे मिम्स नवीन-उल-हकने शेअर केले होते. याच नवीन-उल-हकला आधी संघातून वगळून आता पुन्हा संघात संधी देण्यात आलेली नाही. नवीन-उल-हकने अफगाणिस्तानसाठी 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 14 विकेट्स आहेत.
नक्की वाचा >> 'यापेक्षा Final ला पाकिस्तान परवडला असता'; 'हे' आकडे पाहून रोहित शर्माही हेच म्हणेल
हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह जादरान, नवीन-उल-हक, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, इकराम अली खिल, करीम जनत, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, नूर अहमद, अब्दुल रहमान.
World Cup Bound AfghanAtalan Squad
Presenting before you the AfghanAtalan squad for the ICC Cricket World Cup 2023 in India.#AfghanAtalan | #CWC23 | #WarzaMaidanGata pic.twitter.com/r0SGg3KV8v
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 13, 2023
भारत आणि अफगाणिस्तानचा संघ 11 ऑक्टोबर रोजी विश्वचषक स्पर्धेमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.