कोकण रेल्वे

एसी डबल डेकर, शताब्दी बंद करण्याचा कोकण रेल्वेचा इशारा

गणोशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने शताब्दी एक्सप्रेस, एसी डबल डेकर आणि एसी आरक्षित अशा 46 प्रिमियम ट्रेन सोडल्या. मात्र, तिकिट दर प्रमाणापेक्षा जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. हाच धागा पकडत या रेल्वे गाड्यांना प्रतिसाद नसल्याचे कारण देत गाड्या बंद करण्याची धमकी कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Sep 3, 2014, 12:53 PM IST

प्रवाशांनो एसी स्पेशल रेल्वेचा लाभ घ्या, अन्यथा...

कोकण रेल्वेनं प्रवाशांना धमकी वजा विनंती पत्रक दिलंय. ‘एसी स्पेशल गाड्यांचा लाभ घ्या... अन्यथा या गाड्या बंद करण्यात येतील’ असा नवा पवित्रा कोंकण रेल्वेनं घेतलाय.

Sep 3, 2014, 12:49 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक 8 दिवसानंतर पूर्वपदावर

ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झाला होता. आता सर्व गाड्या वेळेनुसार धावत आहेत.

Sep 2, 2014, 12:14 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणेशभक्तांवर विघ्न, रस्ते वाहतूक सुरळीत

आजही कोकणची डबल डेकर रेल्वे ४ तास उशीराने धावत आहे. ही गाडी दोन तासांपासून कासू स्टेशनवर थांबवून ठेवल्याने प्रवासी रखडलेत. त्यामुळे अनेक गणेशभक्त संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे योग्य नियोजनामुळे कोकणचे वळणदार रस्ते मात्र सुकर झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरुन वाहतूक धिम्यागतीने सुरु आहे. वडखळ नाका कोंडी वगळता वाहतूक सुरळीत आहे.

Aug 28, 2014, 01:33 PM IST

रोखठोक : कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची!

कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची! 

Aug 27, 2014, 11:45 PM IST

'कोरे'चा प्रवास : सिग्नल यंत्रणेत बिघाड, काही गाड्या रद्द

 ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झालाय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराकडे निघालेल्या कोकणवासियांचे अतोनात हाल होतायत. त्यातच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास कटकटीचा झालाय. आज अनेक गाड्या पाच ते सहा तास उशिरा धावत अाहेत. जनशताब्दी एक्सप्रेस ठाणे स्थानकात दोन तास रोखून धरण्यात आली होती.

Aug 27, 2014, 07:49 AM IST

दुरूस्तीच्या कामामुळे कोकण रेल्वे रडतखडत

 महाडनजीकच्या कंरजाडीनजीक रेल्वेनं दुरुस्तीचं काम काढलं आहे. यामुळे मांडवी एक्सप्रेस मागील चार तासांपासून रत्नागिरीत अडकून पडली आहे. शिवाय इतर गाड्या यामुळे खोळंबण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी कोकण रेल्वेवर ओढावलेलं खोळंब्याचं विघ्न अद्यापही कायम आहे.

Aug 26, 2014, 10:36 PM IST

कोकण रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा, एकेरीमार्गामुळे कोंडी

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे विघ्न काही केल्या संपण्याच्या मार्गावर नाही. खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे सात डब्बे घसल्याने तब्बल २५ तास वाहतूक ठप्प होती. तर त्याआधी नव्याने सुरु झालेली डबल डेकर ट्रेन रोह्याजवळ मध्य आणि कोरेच्या वादामुळे एकतास उभी करण्यात आली होती. आता तर अनेक गाड्या जादा गाड्या सोडल्यामुळे एकेरीमार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा झालाय.

Aug 26, 2014, 02:10 PM IST

तब्बल 26 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

कोकण रेल्वेवरील ट्रॅक दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. तब्बल 26 तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. वीर आणि करंजाडीदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे 7 डब्बे घसरल्यामुळं कालपासून वाहतूक ठप्प होती. 

Aug 25, 2014, 09:31 AM IST