कोकण रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्यांचे वाढविले थांबे
कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. कोकण रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही मेल आणि काही एक्स्प्रेसच्या थांब्यात वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात थांबे देण्यात आले आहेत.
Jun 4, 2014, 05:46 PM ISTकोकण रेल्वेवर धावणार डबलडेकर एसी ट्रेन!
कोकण रेल्वे मार्गावरुन डबल डेकर रेल्वेची शनिवारी चाचणी घेण्यात आली. मुंबईवरुन सोडलेली ही रेल्वे गाडी कोकण रेल्वे मार्गावरून कशाप्रकारे धावू शकते याची चाचणी घेण्यात आलीय.
May 18, 2014, 02:11 PM ISTमध्य रेल्वेच्या 'कारभारा'मुळे कोकण रेल्वेच्या गाड्या उशीराने
रोहाच्या दिशेने जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्या उशीराने धावत आहेत. सेंट्रल रेल्वेचा पेण जवळ ब्लॉक सुरू असल्याने हा उशीर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
May 14, 2014, 11:48 PM ISTवळविलेल्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार
अन्य मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या आता कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार आहेत. पहाटे 4.20 वाजता नागोठणे येथील अपघातग्रस्त दिवा-सावंतवाडी गाडीचे डबे हटविण्यात यश आले. त्यानंतर कोकण रेल्वेची सेवा सुरु झाली आहे.
May 5, 2014, 12:06 PM ISTकोकण रेल्वे अपघात, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस
कोकण रेल्वेला नागोठणेजवळ झालेल्या अपघातातल्या जखमींची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.
May 5, 2014, 10:44 AM ISTतब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत
तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झालीय. नागोठणे इथं झालेल्या दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानंतर ही वाहतूक विस्कळीत झाली होतीय.
May 5, 2014, 07:53 AM ISTकोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
May 4, 2014, 06:08 PM ISTकोकण रेल्वेला उत्कृष्ट मानांकन
कोकण रेल्वेला कोर्पोरेट संचालनसाठी उत्कृष्ट मानांकन मिळाले आहे. या मानांकनामुळे कोकण रेल्वेच्या मानात तुरा खोवला गेला आहे. वर्षभरात प्रवाशी सुविधा आणि महसुलामध्ये वृद्धी केल्याने हे मानांकन देण्यात आले आहे.
Apr 25, 2014, 04:15 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक सुरू...
तब्बल वीस तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झालीय. मालगाडीचे डबे काढण्याचे काम पूर्ण झाले असून मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना करण्यात आलीय.
Apr 15, 2014, 08:14 AM ISTमालगाडीचे ४ डबे घसरल्यानं कोकण रेल्वे ठप्प
कोकण रेल्वेवर मालगाडीचे चार डब्बे घसरल्यामुळे वाहतूक ठप्प झालीय. आज सकाळी उक्शी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडलीय. दरम्यान, मालगाडीचे डबे रुळावरून हटवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या कामासाठी आठ ते दहा तास लागणार असल्याने अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 14, 2014, 11:37 AM ISTमालगाडी घसल्याने कोकण रेल्वे विस्कळीत, 6 ट्रेन लेट
कोकण रेल्वे मार्गावर आडवली आणि निवसर रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडी पटरीवरून घसरल्याने रेल्वे सेवा एक ते दोन तास ठप्प होती. याचा फटका सहा गाड्यांना बसला. त्यामुळे रेल्वे एक ते दोन तास उशिराने धावत आहेत.
Apr 11, 2014, 03:57 PM ISTचिपळूण-संगमेश्वरमध्ये भूकंप, कोकण रेल्वेला फटका
चिलीमध्ये ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असतानाच कोकणातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. चिपळूण, संगमेश्वर, कोयना, पाटण परिसरात भूकंप झाला. तर चिपळूण आणि उक्षी या कोकण रेल्वेच्या स्टेशन दरम्यान धक्के बसल्याने तीन एक्सप्रेस गाड्या थांबविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला.
Apr 2, 2014, 11:48 AM ISTकोकण रेल्वेचा प्रवास आता कूल कूल
कोकण रेल्वेचा प्रवास सुखकर होणार आहे. गर्दी आणि उन्हाळा यापासून सुटका होण्यासाठी आता कोकण रेल्वेने जादा डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. तेही एसी डबे जोडण्यात येणार आहेत. दादर-मडगाव-दादर जनशताब्दीला तीन तर दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणीला दोन जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 2, 2014, 10:23 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन
गुढी पाडवानिमित्ताने कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर आहे. या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावेल.
Mar 27, 2014, 03:40 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर डबल-डेकर गाडी धावणार
कोकणवासियांसाठी खूषखबर. लवकरच डबल-डेकर ट्रेन धावणार आहे. आगामी अर्थसंकल्पात या रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता कोकणातल्या चाकरमान्यांसाठी खुषखबर आहे. कोकणातल्या रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता लवकरच डबल डेकर रेल्वे सुरू केली जाणार आहे. लवकरच डबल-डेकर ट्रेन धावणार आहे. आगामी अर्थसंकल्पात या रेल्वेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. आहे.
Feb 8, 2014, 08:53 PM IST