पाऊस

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाऊस ठरला 'ताप'दायक

पावसाळा सुरु झाला आणि कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. एकट्या जुन महिन्यात तापाचे ३ हजार ५४८ रुग्ण आढळलेत तर रक्ततपासणीत ३२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचं निष्पन्न झालय. तर अनेक डेंग्यूचे संशयित रुग्णही आढळलेत. इतकी गंभीर बाब असली तरी दोन्ही शहरांत कोणतीही साथ नसल्याचा दावा महापालिकेच्या वतीन करण्यात येतोय.

Jul 6, 2016, 10:19 PM IST

कोल्हापुरात पावसाची संततधार

कोल्हापुरात पावसाची संततधार

Jul 5, 2016, 08:21 PM IST

उत्तराखंड, हिमाचलसह विविध भागांत पाऊस

उत्तर भारतात काही भागात पावसाने थैमान घातले आहे. यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसहित इतर राज्यांमध्ये ढगफुटीसह जोरदार पाऊस झालाय. उत्तराखंडमध्ये ढगफुटीने आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २५ जणांचा मृत्यू पितोडगड येथे झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Jul 3, 2016, 09:26 PM IST

नाशिकच्या गोदावरीला अनेक दिवसानंतर पाणी

दुष्काळाने पहिल्यांदाच कोरडी पडलेली गोदावरी नदी आता वाहण्यास सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदीत पाणी जमा होण्यास सुरूवात झाली आहे, तसेच नदीचं पाणी वाहण्यासही सुरूवात झाली आहे.  आदिवासी पट्यातील इगतपुरीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

Jul 3, 2016, 09:16 PM IST

पुणे शहरात पाऊसच पाऊस

 शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.

Jul 3, 2016, 09:05 PM IST

लोणावळ्यात पाऊस, भूशी डॅमवर गर्दी

पावसाळ्यात युवकांचं आवडतं ठिकाण असलेल्या लोणावळात चांगलाच पाऊस झाला आहे. लोणावळ्याला मोसमी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.

Jul 3, 2016, 08:56 PM IST

पाऊसामुळे मुंबई कोलमडली, विकेन्डला समुद्र किनाऱ्यावर मात्र गर्दी

मुसळधार पावसानं मुंबापुरीला अक्षरशः झोडपून काढलंय. सकाळपासून मुंबईच्या प्रत्येक भागात जोरदार पाऊस होतोय. मान्सूनचं आगमन झाल्यापासून पावसाचा जोर सर्वाधिक म्हणावा लागले. दुपारच्या सुमारास पूर्व आणि पश्चिम उपनगरात झालेल्या पावसानं संपूर्ण जनजीवनचं कोलमडलं. सायनजवळ रेल्वे ट्रॅकवप पाणी आलं. तर हार्बर लाईनवर लोकल बंद पडल्यानं वेळपत्रकाचे तीन तेरा वाजले. इकडे मध्य आणि दक्षिण मुंबईतल्या बहुतांश सखल भागात पाणी साचलं. हिंदमाता, गांधी मार्केट, माहेश्वरी उद्यान आणि सायनमध्ये पाणी भरलं. यामुळे रस्ते वाहतुकीचाही बोजवारा उडाला. हवामान खात्यानं पुढचे ४८ तास पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Jul 2, 2016, 09:24 PM IST

रेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या

रेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या

Jul 2, 2016, 07:32 PM IST

मुंबईत जोरदार पाऊस, त्यातच समुद्राला भरती

मुंबईत जोरदार पाऊस, त्यातच समुद्राला भरती 

Jul 2, 2016, 07:30 PM IST