नववर्षाचं सेलिब्रेशन, भंडारदरा धरण परिसराला पर्यटकांची पसंती
नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भंडारदार धरणाच्या परीसरातही नविन वर्ष साजरं करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
Dec 31, 2017, 03:01 PM ISTनववर्षाचं सेलिब्रेशन, भंडारदरा धरण परिसराला पर्यटकांची पसंती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 02:16 PM ISTअहमदनगरमधील भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं
जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे. अकरा हजार साठ टीएमसी इतकी भंडारदरा धरणाची क्षमता आहे. सध्या भंडारदरा आणि २६ हजार टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. यामुळे या दोन्ही धरणांसह निळवंडे धरणातला पाणीसाठा वेगानं वाढत आहे. तसंच वरुणराजा धोधो कोसळत असल्यानं अकोले तालुक्यातल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांतून शेकडो प्रपात फेसाळत वाहत आहेत. तर रंधा फॉल, नेकलेस फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वत्र समाधानकारक पाउस पडत असल्यानं उत्तर अहमदनगर भागातल्या शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे. तुलनेनं दक्षिण अहमदनगर जिल्ह्यात अजूनही पावसानं पाठ फिरवलेली असल्यानं मात्र शेतक-यांत चिंतेचं वातावरण आहे.
Jul 25, 2017, 09:13 AM ISTभंडारदरा धरणातून मराठवाड्याला पाणी
तहानलेल्या मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आलंय. अडीच टीएमसी पाणी सोडण्याच्या आदेशानुसार धरणातून 5 हजार क्यूसेक्सनं पाणी सोडण्यात येतंय.
Oct 21, 2012, 10:30 AM IST