सेनेची लढाई आघाडीशी की भाजपशी? - देवेंद्र फडणवीस
भाजपवर शिवसेना नेत्यांकडून सातत्यानं टीका होत आहे. त्याला आज भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. आपली खरी लढाई कोणाशी आहे. आघाडी सरकारशी की भाजपशी, याचा शिवसेनेनं विचार करण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले.
Oct 6, 2014, 12:24 PM IST'तेव्हा' बाळासाहेबांविषयीचा आदरभाव कुठं गेला? - उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन युती तुटत असताना हा आदरभाव कुठं गेला होता असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला आहे. बाळासाहेबांनी अभेद्य ठेवलेली युती तुटली नसती तर तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरली असती असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
Oct 6, 2014, 12:03 PM ISTशिवसेना- भाजपमध्ये नाव न घेता वाकयुद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 09:35 AM ISTराज ठाकरेंची तोफ पहिल्यांदा मोदींवर धडाडली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भाजपवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार जाहीर सभेतून हल्लाबोल केला आहे.
Oct 5, 2014, 10:59 PM ISTतर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा - राज ठाकरे
मुंबईकडे वेड्या वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत केली, तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहणार, असा इशारा राज ठाकरे यांनी घाटकोपरच्या सभेत दिला आहे.
Oct 5, 2014, 09:52 PM ISTहे मुद्दे भाजपसाठी महाराष्ट्रात डोकेदुखीचे ठरू शकतात
केंद्रात यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची अपेक्षा असलेल्या भाजपला काही महत्वाचे मुद्दे डोकेदुखी ठरू शकतात, किंबहुना भाजप नेत्यांनाही या मुद्यांची कुणकुण कार्यकर्त्यांकडून लागली असावी.
Oct 5, 2014, 08:04 PM ISTपृथ्वीराज चव्हाणांचे नरेंद्र मोदींवर आसूड
मुंबईचं खच्चीकरण करून अहमदाबादचं महत्व वाढवण्याचं नरेंद्र मोदींनी डोक्यात घेतलंय, अशी सणसणीत टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
Oct 5, 2014, 06:06 PM ISTभाजपच्या सभेतील कचरा उचलून शिवसेनेची भाजपवर कुरघोडी
सभेनंतर मैदानातील कचरा उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार केलं जात असतानाच मुंबईतील महालक्ष्मी इथं झालेल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडं दुर्लक्षच केलं आहे. सभेनंतर मैदानात सर्वत्र कचरा पडून होता. अखेरीस रविवारी सकाळी शिवसेनेनं मैदानात स्वच्छता मोहीम राबवून भाजपवर कुरघोडी केली आहे.
Oct 5, 2014, 03:54 PM ISTशिवसेना- भाजपमध्ये नाव न घेता वाकयुद्ध
शिवसेना आणि भाजपमध्ये नाव न घेता जोरदार वाकयुद्ध सुरु झालंय. २५ वर्ष जुनी असलेली युती तुटल्यानंतर आता हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात बोलू लागले आहेत. सुरुवातीला आम्ही शिवसेनेवर टीका करणार नाही, असं म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणं सुरू केलंय.
Oct 5, 2014, 01:25 PM ISTबाळासाहेबांबद्दल आदर, शिवसेनेवर टीका करणार नाही- मोदी
बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला खूप आदर आहे. त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांनी बनवलेल्या शिवसेनेविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितलंय.
Oct 5, 2014, 01:03 PM ISTमी मतदान करू शकतो, तर चर्चा का नाही- आदित्य ठाकरे
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेकडून सातत्यानं भाजपवर टीकास्त्र सोडलं जातंय. त्यात युवासेनेचे अक्षध्य आदित्य ठाकरेही भाजपवर सडकून टीका करत आहेत.
Oct 5, 2014, 08:16 AM ISTशिवाजी महाराजांच्या नावाने खंडणी मागण्याचे काम - फडणवीस
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर आम्ही शिवसेनेवर कोणतीही टीका करणार नाही, असे सांगणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष घणाघात चढवला. शिवाजी महाराजांच्या नावावर खंडणी मागण्याचे कोणी काम केले आहे ते पाहा, असे फडणवीस म्हणालेत.
Oct 4, 2014, 10:56 PM ISTशिवसेनेवर देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 10:20 PM ISTशिवसेनेबाबत मौन, काँग्रेस-राष्ट्रवादीवर मोदींचा हल्लाबोल
मुंबईच्या सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा उल्लेख टाळल मौन बाळगणे पसंत केले. त्याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या १५ वर्षांत या लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास केला नाही. गुंडागर्दी, दादागिरी केली. जमिनींवर, झोपड्डीवर कब्जा करणारे लोक तुम्हाला हवे आहेत का?, असा सवार मोदी यांनी मुंबईकरांना विचारला.
Oct 4, 2014, 10:02 PM ISTमहाराष्ट्राला लुटलं गेलंय, विकासासाठी बहुमत द्या - नरेंद्र मोदी
महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे. गेल्या ६० वर्षात महाराष्ट्राला काँग्रेसने कुठे नेवून ठेवलाय. महाराष्ट्राला लुटलं गेलं आहे. विकास केला नाही. कुठे नेला आहे, याला कोण जबाबदार आहे, असा सवाल करत महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ते जाहीर प्रचार सभेत बोलत होते.
Oct 4, 2014, 06:33 PM IST