मेरी 'बेडुकउडी' नहीं 'ढाण्यावाघ' की उडी हैं - आठवले
मेरी 'बेडुकउडी' नहीं 'ढाण्यावाघ' की उडी हैं - आठवले
Oct 6, 2014, 05:18 PM ISTलोणावळ्यात अमित शाहांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
Oct 6, 2014, 05:16 PM ISTमोदींनी पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला तडा दिला : शरद पवार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधानसभेच्या निवडणुकीत देशाचा कारभार सोडून राज्यात २२ सभा घेत आहेत, यामुळे पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला त्यांनी तडा गेलाय, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय.
Oct 6, 2014, 05:11 PM ISTराज्याचं सिंचन वाढवलं, हा घोटाळा नाही : अजित पवार
मी सिंचन घोटाळा केला नाही, विरोधकांनी फक्त आपल्या नावाचं वावटळ उठवलं, बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. राज्याचं उलट सिंचन क्षेत्र वाढवलं, सिंचन क्षेत्र वाढवणे हा घोटाळा नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Oct 6, 2014, 05:02 PM ISTकालपण, आजपण आणि उद्यापण... मी स्वच्छच!
कालपण, आजपण आणि उद्यापण... मी स्वच्छच!
Oct 6, 2014, 04:26 PM ISTभाजप विरोधासाठी राज-उद्धव एकत्र?
भाजप शिवसेनेपासून दुरावला असला तरी भाजपमुळंच ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी सुरू झाल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्तानं दिसतंय. शिवसेना आणि मनसेनं भाजपला लक्ष्य करण्याचा एककलमी अजेंडा निवडणूक प्रचारात राबवलाय.
Oct 6, 2014, 03:52 PM IST'महाराष्ट्राला जिंकायला अफजल खानाची फौज आलीय'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांत टिका केलीय.
Oct 6, 2014, 03:46 PM ISTमोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले.
Oct 6, 2014, 03:37 PM ISTजोगेश्वरीत मराठी मत विभागणीचा फटका
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर दुस-यांदा विधानसभेवर जाण्यासाठी तयारीत आहेत. या मतदारसंघात पंचरंगी लढत होत असल्यामुळे मराठी मत विभागणीचा फटका शिवसेनेला बसू शकतो.
Oct 6, 2014, 03:16 PM IST‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले
माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
Oct 6, 2014, 03:00 PM IST'स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला उमेदवार आयात करावे लागतात'
आम्हाला स्वबळावर सत्ता द्या, असे सांगणाऱ्या भाजपला स्वत:चे उमेदवार का मिळाले नाहीत. त्यांना दुसऱ्यांचे उमेदवार आयात का करावे लागलेत. म्हणे स्वबळ, मी म्हणतो यांच्याकडे उमेदवार नाहीत, हे काय विकास करणार? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची यादीच वाचून दाखविली.
Oct 6, 2014, 02:19 PM ISTतुम्ही असाल पंतप्रधान, खोटे आरोप कराल कोर्टात खेचू - सुप्रिया सुळे
पवार कुटुंबीयांवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आरोप करण्यात आल्याने खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे संतप्त झाल्यात. त्यांनी विरोधकांना थेट कोर्टात घेण्याचा इशाराच दिला.
Oct 6, 2014, 01:20 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या रडारावर
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुरू झाल्यानंतर आता उर्वरित चारही पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांना आपल्या रडारवर आणलंय. मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींबाबत प्रश्न उपस्थित केलेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा सवाल राज यांनी केलाय.
Oct 6, 2014, 12:35 PM ISTनाशिकमध्ये मतविभाजनाचा मनसेला फायदा मिळणार?
नाशिकमध्ये मतविभाजनाचा मनसेला फायदा मिळणार?
Oct 6, 2014, 12:30 PM IST