शेतकरी

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी करण्याचं काम सुरू

 उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातील शेतकरी कर्जाचा अभ्यास राज्य सरकारने सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आली आहे.

Apr 12, 2017, 02:21 PM IST

कृउबा निवडणुकीत आता थेट शेतकरी मतदान करणार

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सरपंच, व्यापारी, विकास सोसायटी सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. 

Apr 12, 2017, 09:25 AM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, एनडीए बैठकीत उद्धव ठाकरेंची मागणी

शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवर्जुन मागणी शिवसेनेने केली आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे योगींच्या सरकारने कर्जमाफ केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

Apr 11, 2017, 12:52 PM IST

'शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम बेगडी'

शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम हे बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. राज्यात कर्जमाफीचा विषय महत्वाचा असतांना याचे लोकसभेतील खासदार हे हवाई प्रवासावरून भांडताना दिसून आले. मात्र त्या वेळी कोणीही कर्जमाफीच्या मुद्यावर खासदार भांडले नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. 

Apr 11, 2017, 11:53 AM IST

शेतमाल निर्यात बंदी उठविण्यासाठी आसूड यात्रा, CM ते PM निवासस्थानी धडकणार

प्रहार संघटनेतर्फे आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते गुजरातमधील पंतप्रधानांच्या वडनगर येथील घरापर्यंत ही यात्रा असेल. 

Apr 11, 2017, 09:02 AM IST

राज्यात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेत नाहीत. संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडग्यातील शेतकरी शांताराम हांडे यांनी शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केलीय. 

Apr 9, 2017, 05:47 PM IST