bcci

बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण!

बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे...

Jun 1, 2015, 05:04 PM IST

'बीसीसीआय'मध्ये 'त्रिमूर्ती'चा समावेश

'बीसीसीआय'च्या कामकाजामध्ये दिग्गज माजी क्रिकेटपटूंचा समावेश केला जाणार आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेटमधले 'त्रिमूर्ती' नव्या भूमिकेत दिसणार आहेत. 

May 29, 2015, 07:07 PM IST

सौरव गांगुली टीम इंडियाचा डायरेक्टर की कोच?

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला भारतीय टीमचा डायरेक्टर बनवलं जावू शकतं. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरवला भारतीय टीमसोबत बांग्लादेशला पाठवलं जाणार आहे. मात्र सौरवला टीमचा प्रशिक्षक बनायचं आहे. 

May 24, 2015, 12:53 PM IST

आयपीएल ७ : चेन्नईच्या खेळाडूच्या खोलीत रात्रभर तरूणी?

 आयपीएल सामन्यावेळी रंगारग पार्ट्या आणि इव्हेंटमध्ये अनेकवेळा प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. इंग्रजी वृत्तपत्र ' इंडियन एक्स्प्रेस' ने दिलेल्या बातमीनुसार गेल्या सीझनमध्ये एका व्यक्तीच्या जहाजावर प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेवन पंजाबच्या खेळाडूंना पार्टी देण्याचे प्रकरण आयसीसीच्या अँटी करप्शनच्या स्कॅनरमध्ये आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूच्या रूममध्ये एका महिलेने रात्र घालविली तसेच शाहरुख खानच्या मित्राने बीसीसीआयच्या परवानगीशिवाय केकेआरच्या खेळाडूंना डिनर पार्टीचे आयोजन करण्याचे प्रकरणही चौकशीच्या घेऱ्यात आहे. 

May 22, 2015, 07:57 PM IST

अनुष्का भेटीमुळं विराटला बीसीसीआयनं पाठवली नोटीस

भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरूचा कर्णधार पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रविवारी दिल्ली विरूद्धच्या सामन्यादरम्यान अनुष्कासोबतची भेट विराटला महागात पडली आहे, कारण बीसीसीआयनं याबाबत विराटला नोटीस पाठवली आहे. 

May 19, 2015, 12:35 PM IST

चेन्नई सुपरकिंग्स टीमची किंमत केवळ 5 लाख रूपये

आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन आणि चेन्नई सुपर किंग टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इंडिया सिमेंटने केवळ ५ लाखात चेन्नई टीम आपल्या सहयोगी टीमला विकून टाकण्याचा निर्णय घेतला. 

Apr 24, 2015, 05:18 PM IST

क्रिकेट खेळाडूंच्या हॉटेलवर चिअरलीडर्स, बीसीसीआयची बंदी

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासून चिअरलीडर्स यांची भूमिका खास ठरली. आयपीएल सीजनच्या सुरुवातीपासून चिअरलीडर्स जल्लोष करताना दिसत होत्या. त्यांच्या कपड्यांवरुन वादळ उठल्यानंतर त्यांना पूर्ण कपडे परीधान करण्यास भाग पाडण्यात आले. आता तर त्यांना ज्या हॉटेलमध्ये खेळाडू असतील त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी बीसीसीआयने घातली आहे.

Apr 16, 2015, 03:04 PM IST

राजस्थान रॉयलच्या खेळाडूला स्पॉट फिक्सिंगची ऑफर

आयपीएलवर पुन्हा एकदा फिक्सिंगचं सावट निर्माण झालं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयलच्या एका खेळाडूनं बीसीसीआयच्या अॅंटी करप्शन युनिटकडे फिक्सिंगसाठी ऑफर मिळाल्याची तक्रार केली आहे. 

Apr 10, 2015, 01:48 PM IST

राजीव शुक्ला पुन्हा IPL अध्यक्ष, तर गांगुली सदस्य

राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Apr 7, 2015, 08:29 AM IST

सुनिल नारायणचा आयपीएल-८मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा

वेस्ट इंडिजचा जादुई स्पिनर आणि आयपीएलमध्ये कोलकत्ता नाईट रायडरकडून खेळणारा सुनिल नारायणचा आयपीएल-८मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या रिव्ह्यू कमिटीनं नारायणच्या बॉलिंग अॅक्शनला क्लीन चिट दिली आहे. 

Apr 6, 2015, 04:02 PM IST

चीअर लीडर्सची विकेट पडणार?

जंटलमेन्स गेमला फिक्सिंग आणि सट्टेबाजांपासून वाचवणं बीसीसीआयपुढे मोठं चॅलेंज आहे. या सगळ्याशी समाना करण्यासाठी आयपीएलमधअये आपल्या अदांनी सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरणा-या ग्लॅमरस चीअर लीडर्सची आता विकेट पडणार आहे. 

Apr 3, 2015, 07:25 PM IST

'मौका मौका'चा बीसीसीआयला त्रास , 'मौका' साधत का केला कार्यालयाचा फोन बंद

वर्ल्ड कप २०१५ दरम्यान भारताला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडून 'मौका मौका' ही जाहिरात प्रसिद्ध करण्याता आली होती. त्या जाहिरातीचा जेवढा आनंद भारतीय प्रेक्षकांनी लुटला, तेवढाच त्रास आता बीसीसीआयला सहन करावा लागत आहे. चक्क बीसीसीआयने आपला फोन बंद करण्याचा निर्णय घेतला.

Mar 28, 2015, 01:12 PM IST

टीम इंडिया : खेळाडूंना पत्नी, गर्लफ्रेन्डसोबत राहण्याची परवानगी

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेन्ड सोबत राहण्याची परवानगी दिली आहे. वर्ल्डकप दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना यापूर्वी ही परवानगी देण्यात आली नव्हती. टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे, क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगला देशशी होणार आहे.

Mar 16, 2015, 08:36 PM IST

क्रिकेट सामन्यादरम्यान प्रेक्षकांना "नो ऑटोग्राफ"

क्रिकेटमध्ये होणारी स्पॉट फिक्सिंग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सामना सुरू असतांना प्रेक्षकांना खेळांडूनी ऑटोग्राफ देण्यास बंदी घालण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय, तसे आदेशही खेळाडूंना देण्यात आले आहे.

Mar 9, 2015, 02:46 PM IST