bcci

महिलेसोबत पकडला गेला होता क्रिकेटर

पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटसंबंधी एक मोठी बातमी.... टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार २०१०मध्ये टीम इंडियाचा एक क्रिकेटर आपल्या रूममध्ये नाही तर एका महिलेसोबत दुसऱ्या रूममध्ये सापडला होता.

Nov 19, 2014, 05:19 PM IST

यापुढे भारत वेस्ट इंडिजसोबत नाही खेळणार

बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डानं वेस्ट इंडिजवर निलंबनाची कारवाई केली आहे. भारतानं यापुढे विंडीज बरोबर न खेळण्याचा निर्णय घेतलाय. 

Oct 21, 2014, 05:39 PM IST

विराट कोहली कर्णधार, श्रीलंका दौरा जाहीर

श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीवर भारतीय संघाचे नेतृत्व सोपविले आहे.

Oct 21, 2014, 03:27 PM IST

सीरिज अर्धवट सोडून वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार

भारत वि. वेस्ट इंडिजचा एकदिवसीय सामना रद्द होणार आहे. क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये वेतनावरून वाद झाला असल्यानं हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं दिलीय. याबाबतचं पत्रच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयला लिहिलंय. 

Oct 17, 2014, 05:25 PM IST

धोनी-कोहलीपेक्षाही जास्त कमावतात शास्त्री-गावसकर

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर आणि पाचव्या क्रमांकावर सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू आहे... हे आपल्याला माहितच आहे. पण, त्याच्यापेक्षाही जास्त कमाई त्याचे सिनियर आणि क्रिकेट कमेंट्री करणारे माजी क्रिकेटर रवि शास्त्री आणि सुनील गावसकर करताना दिसत आहे. 

Oct 13, 2014, 11:51 AM IST

महेंद्रसिंग धोनीच्या विधानावर बीसीसीआयची नाराजी

आगामी 2015वर्ल्ड कपमध्येही बॉस डंकन फ्लेचर हेच मार्गदर्शन करतील, या कॅप्टन महेंद्र सिंग धोनीच्या विधानावर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केलीय. 

Aug 26, 2014, 12:22 PM IST

धोनीला कप्तानपदावरून हटवण्याची गरज नाही - बीसीसीआय

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)नं आयसीसी वर्ल्डकपसाठी उरलेला केवळ सहा महिन्यांचा कालावधी लक्षात घेऊन महेंद्र सिंग धोनीच कप्तानपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

Aug 20, 2014, 12:31 PM IST

धोनी, कोहलीच्या नावाची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पद्मभूषण आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयनं शिफारस केली आहे. बीसीसीआयनं क्रीडामंत्रालयाकडे या दोघांच्या पुरस्कारासाठी ही शिफारस केलीय. 

Aug 13, 2014, 02:53 PM IST

BCCIची अनुष्काला सोबत न्यायची परवानगी नाही- शुक्ला

 भारताचा क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघं इंग्लंडमध्ये एकत्र असल्याच्या बातमीनंतर आता बीसीसीआयला जाग आलीय आणि त्यांनी म्हटलंय की, या दोघांना बीसीसीआयकडून अशी कोणतीही परवानगी दिली गेलेली नाही.

Jul 21, 2014, 07:39 PM IST

गावसकर मुक्त झाले; मानधनही मिळणार!

 भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या हंगामी अध्यक्षपदावरून मुक्त झाले आहेत. 

Jul 19, 2014, 11:20 PM IST

पगारासाठी लिटिल मास्टरचं सुप्रीम कोर्टाला पत्र

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष सुनील गावसकर यांनी आपल्याला आपल्या कामाचा मोबदला, आपला पगार मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितलीय. 

Jul 11, 2014, 03:24 PM IST

एन.श्रीनिवासन झाले आयसीसीचे नवे चेअरमन

आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय. 

Jun 26, 2014, 01:36 PM IST

टीम सिलेक्शनमध्ये मुलाचं नाव आल्यास बैठकीतून उठतो - रॉजर बिन्नी

भारतीय क्रिकेट टीमचे निवडकर्ते आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी म्हणाले, जेव्हा टीमचं सिलेक्शन होतं तेव्हा जर त्यांच्या मुलाचं स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर चर्चा होत असेल तेव्हा मी बैठकीतून उठून जातो. इंग्रजी वृत्तपत्रासोबत केलेल्या बातचितमध्ये ते बोलत होते.

Jun 19, 2014, 04:00 PM IST

अमित शहांना ‘BCCI’च्या उपाध्यक्षपदाची लॉटरी?

भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.

May 15, 2014, 05:57 PM IST