central government

केंद्र सरकारचं 2 सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दोन सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन केलं आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास पार्लमेंट्री लायब्ररीमध्ये ही बैठक होणार आहे.. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक फंडाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. तर संध्याकाळी सातच्या सुमारास अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Jan 30, 2017, 09:52 AM IST

अभय योजनेचे पैसे स्वीकारण्यास सहकारी बँकांना बंदी

केंद्र सरकारच्या नव्या अभय योजनेमध्ये ठेवी स्वीकारण्यास केंद्र सरकारनं सर्व सहकारी बँकांना बंदी केली आहे.

Jan 20, 2017, 05:54 PM IST

जल्लीकट्टूच्या समर्थनात आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता

जल्लीकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. त्यात आता सर्वोच्च न्यायायलायनं घेतलेल्या निर्णयानं आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

Jan 20, 2017, 02:27 PM IST

केंद्र सरकारकडून ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट

डिजिटल पेमेंट करणा-या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून आजपासून या ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट मिळणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून लकी ग्राहक योजना आणि लकी व्यापारी योजना सुरु केलीये.

Dec 25, 2016, 08:08 AM IST

नोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.

Dec 23, 2016, 11:59 AM IST

चेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत. 

Dec 20, 2016, 12:45 PM IST

मेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये

केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत. 

Dec 20, 2016, 11:17 AM IST

बियाणे खरेदीसाठी जुन्या 500, 1000च्या नोटा चालणार, सरकारचा निर्णय

केंद्र सरकारनं रब्बी बियाणे खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडील पाचशेची नोट ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलाय. 

Nov 21, 2016, 03:02 PM IST

रिलायन्सला दणका, मोदी सरकारनं लावला सहा हजार कोटींचा दंड

केंद्र सरकारनं मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, BP आणि NIKO या तिन्ही पार्टनरना तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Nov 5, 2016, 04:42 PM IST

राज्याने केंद्राला कांदा खरेदीचा प्रस्तावच पाठवलाच नाही

राज्य सरकारनं कांदा खरेदीचा प्रस्ताव पाठवला नसल्याच्या झी 24 तासच्या वृत्तावर खुद्द पणन मंत्र्यांनीच शिक्कामोर्तब केलंय. व्यापा-यांनी संप मागे घेतल्यामुळं सरकारनं कांदा खरेदी सुरू केली नसल्याचं अजब स्पष्टीकरणं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

Aug 24, 2016, 05:23 PM IST

केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचं पेंशन वाढणार

केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता कमीतकमी ९००० रुपये पेंशन मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या नव्या शिफारशींनुसार सध्याच्या पेंशनमध्ये 157.14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Aug 7, 2016, 06:09 PM IST

खूशखबर! मोदी सरकार महागाईपासून देणार दिलासा

वाढती महागाई पाहता मोदी सरकारने देशातील सामान्य नागरिकांना एक खुशखबरी दिली आहे. केंद्र सरकारने राज्यांना दाळ, तेल आणि यासारख्या आवश्यक खाद्य वस्तूंवर लागणारा लोकल टॅक्स न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 24, 2016, 08:59 PM IST

उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा

‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, अशा शब्दात पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

Jul 24, 2016, 10:20 AM IST

केंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?

केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.

Jun 3, 2016, 06:53 PM IST