आयपीएल टीमच्या मालकांमध्ये कोण आहे सर्वात गरीब? कोणाकडे किती संपत्ती?
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पाडणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगपैकी एक असून यातून दरवर्षी भारतीय आणि विदेशातील अनेक खेळाडू मोठी कमाई करतात. आयपीएलमध्ये सध्या एकूण १० संघानी सहभाग घेतला असून अनेक संघांचे मालक हे मोठे उद्योगपती तसेच बॉलिवूड सुपरस्टार आहेत. तेव्हा 10 संघांपैकी कोणत्या संघाचे मालक जास्त श्रीमंत आहेत, तसेच त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात.
Nov 16, 2024, 06:42 PM ISTIPL ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीत घेतले 10 पैकी 10 विकेट्स
Anshul Kamboj 10 Wickets In Ranji Trophy : हरियाणाच्या अंशुल कांबोजने केरळ विरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट घेतले. रणजी ट्रॉफी सामन्यात असा पराक्रम करणारा अंशुल हा तिसरा गोलंदाज ठरला.
Nov 15, 2024, 02:10 PM ISTIPL जिंकण्यासाठी RCB चा मास्टर प्लान! लिलावात 'या' 10 खेळाडूंवर असेल नजर; खर्च करणार तब्बल 830000000 रुपये
IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी आता अवघे काही शिल्लक असून प्रत्येक फ्रेंचायझी ऑक्शनमध्ये येणाऱ्या कोणत्या खेळाडूंना टार्गेट करायचे याचं प्लॅनिंग करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असला तरी त्यांना आजतागायत आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेलं नाही. तेव्हा आयपीएल 2025 जिंकण्यासाठी RCB ने मोठा मास्टर प्लान आखला असून ऑक्शनमध्ये त्यांची 10 खेळाडूंवर नजर असणार आहे.
Nov 14, 2024, 05:27 PM ISTअर्जुन तेंडुलकर 'मुंबई' सोडणार? 2022 मध्ये 'गुजरात'ने दाखवलेला इन्ट्रेस्ट; अखेर MI ने मोजलेली 'इतकी' रक्कम
इंडियन प्रीमिअर लीग या जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनचं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या अनेक जुन्या आणि नव्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला रिलीज केलं आहे. त्यामुळे मुंबईचा मेंटॉर असलेल्या सचिनचा मुलगा अर्जुन याला आपल्या संघात घेण्यासाठी कोणता संघ इन्ट्रेस्ट दाखवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Nov 14, 2024, 01:13 PM IST
CSK चं ठरलं! IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 'या' 10 खेळाडूंना संघात घेण्यासाठी खिसा रिकामा करणार
IPL 202 Mega Auction, Chennai Super Kings: आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन 24आणि 25 सप्टेंबरला होणार असून याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहील आहे. जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनसाठी हे ऑक्शन होणार असून यात एकूण 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपरकिंग्सने ऑक्शनपूर्वी आपल्या 5 खेळाडूंना रिटेन केलंय. यात ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, एम एस धोनी, पथीराना आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तेव्हा आता संघातील उर्वरित जागांसाठी सीएसके कोणावर दाव लावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ऑक्शनमध्ये असे 10 खेळाडू आहेत ज्यांच्यावर ऑक्शनमध्ये सीएसके हमखास बोली लावू शकते.
Nov 12, 2024, 09:16 PM ISTमुंबई इंडियन्स IPL Auction मध्ये 'या' 5 माजी खेळाडूंवर लावणार बोली
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनचं बिगुल वाजलं असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यासाठी मेगा ऑस्कन पार पडणार आहे.
Nov 11, 2024, 04:52 PM ISTIPL ऑक्शनमध्ये गोविंदाचा जावई होणार मालामाल, कसा आहे त्याचा रेकॉर्ड?
नितीश राणा हा नात्याने बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा जावई लागतो. नितीशची पत्नी सांची ही गोविंदाची भाची आहे.
Nov 11, 2024, 03:51 PM ISTBCCI च्या नव्या नियमांचा 'या' स्टार खेळाडूला फटका, एका निर्णयामुळे 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी
मागील काही वर्षांपासून स्टोक्स दुखापत आणि वर्क लोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे आयपीएलमध्ये खेळत नव्हता. तसेच यंदाही त्याने आपलं नाव आयपीएल मेगा ऑक्शनसाठी (IPL 2025 Mega Auction) नोंदवलेलं नाही.
Nov 7, 2024, 07:23 PM ISTश्रेयस अय्यरने द्विशतक ठोकून मोडले सर्व रेकॉर्डस्, IPL मेगा ऑक्शनपूर्वी केली धडाकेबाज कामगिरी
Shreyas Iyer Ranji Trophy : श्रेयसने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून त्याने या सामन्यात मुंबई संघासाठी मोठी कामगिरी केली. ओडिशा विरुद्ध त्याने द्विशतक ठोकलं असून यादरम्यान अय्यरने 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत.
Nov 7, 2024, 12:48 PM ISTमुंबई इंडियन्सपासून आरसीबीपर्यंत कोणते खेळाडू रिटेन होणार? पाहा सर्व 10 संघांची यादी
IPL 2025 Teams Retention List : आयपीएल 2025 साठी सर्व 10 संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. त्यामुळे कोणते खेळाडू रिटेन होणार आणि कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Oct 30, 2024, 06:20 PM ISTआयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली समोर, कुठे आणि कधी होणार आयोजन?
IPL 2025 Mega Auction Date: इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी टी 20 लीगपैकी एक असून लवकरच याच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलच्या सर्व 10 फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायची आहे. आयपीएल ऑक्शनची चर्चा सुरु असताना त्याची तारीख आणि ठिकाण याबाबत माहिती सुद्धा समोर आली आहे.
Oct 17, 2024, 03:34 PM ISTरोहित मुंबई इंडियन्स सोडून RCB मध्ये आला तर...; Auction आधी डिव्हिलियर्सचं मोठं भाकित
IPL 2024 Mega Auction Rohit Sharma To Join RCB: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 च्या पर्वात रोहितकडून कर्णधारपद काढून घेत ते गुजरात सोडून मुंबईच्या संघात आलेल्या हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं. आता रोहित मुंबईची साथ सोडेल अशी चर्चा असतानाच डिव्हिलियर्सने यावर एक सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणालाय पाहूयात...
Oct 6, 2024, 12:40 PM ISTचेन्नई सुपरकिंग्समधून रहाणे सह 'या' 4 खेळाडूंचा पत्ता कट?
चेन्नई सुपरकिंग्स ऑक्शनपूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी जेवढी चर्चा सुरु आहे तेवढीच चर्चा CSK कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याची सुद्धा आहे.
Oct 4, 2024, 07:33 PM IST'हार्दिक पांड्या 18 कोटींच्या लायकीचा नाही' आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
Hardik Pandya IPL 2025 : आयपीएल 2025 ला अद्याप बरेच महिने बाकी आहेत. पण त्याआधीच मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आता एका दिग्गज क्रिकेटपटूने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
Oct 3, 2024, 09:10 PM ISTमुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? नावं आली समोर
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजन पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार असून यासाठी आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. तेव्हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ठरलेल्या फ्रेंचायझींपैकी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी चर्चा सुरु आहे.
Sep 29, 2024, 04:15 PM IST