पंतप्रधानांच्या फेअरवेल पार्टीला राहुलची दांडी!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी फेअर वेल डिनरचं आयोजन केलं. सोनियांच्या दिल्लीतल्या 10 जनपथ या निवासस्थानि आयोजित केलेल्या या डिनर पार्टीला युपीए-2 सरकारमधले केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, वीरप्पा मोईली, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, चिरंजीवी आणि काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
May 15, 2014, 08:13 AM ISTपंतप्रधानांच्या निवासस्थानी `पॅकअप`ची तयारी
भारताच्या पंतप्रधानांचं निवासस्थान 7 रेसकोर्स रोडवर सध्या लगबग सुरू आहे, ही लगबग पंतप्रधानांच्या सामानाच्या आवरा आवर आहे.
May 9, 2014, 02:29 PM IST‘वडिलांनी राजीनामा द्यावा, ही पंतप्रधानांच्या मुलीची होती इच्छा’
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोपी नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी देणारा अध्यादेश फाडला तेव्हा पंतप्रधानांच्या मुलीलाही वाटत होतं की आपल्या वडिलांनी राजीनामा द्यावा... असा दावा केलाय पंतप्रधानांचे माजी सल्लागार संजय बारू यांनी..
May 8, 2014, 01:22 PM ISTपंतप्रधानांच्या भावानं दिला मोदींच्या हातात हात!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पंतप्रधानांच्या भावानं दलजीत सिंह कोहली यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
Apr 25, 2014, 08:54 PM ISTपंतप्रधानांच्या बचावासाठी मुलगी सरसावली...
पंतप्रधान मनमोहन सिंग यांची मोठी मुलगी उपिंदर सिंह आता आपल्या वडिलांच्या बचावासाठी पुढे आलीय.
Apr 15, 2014, 11:53 AM ISTसंजय बारू यांच्या पुस्तकासंदर्भात काँग्रेसचा प्रतिहल्ला
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी "दि ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : दि मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहनसिंग` हे पुस्तक ऐन निवडणूकीच्या वातावरणात काढून विरोधकांच्या हातात आयतं कोलीतचं दिलंय.
Apr 13, 2014, 05:52 PM ISTकाँग्रेस प्रचारापासून मनमोहन सिंग लांबच
उगवत्याला नमस्कार करायचा, आणि मावळत्याकडे पाठ फिरवायची, राजकीय नेत्यांना हे मुळीच नवं नाही. असंच सध्या सुरू आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या सभा, रॅलींमधून राहुल गांधी, सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेते दिसतायेत. मात्र दहा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेले मनमोहन सिंग यांचा पत्ताच नाही. गेली दहा वर्षं ज्यांनी या देशाला सांभाळलं ते सिंग आज किंग राहिले नाहीत.
Apr 12, 2014, 09:44 PM ISTसोनियांनी नाही तर पवारांनी दिली `कमकुवत` पंतप्रधानांची साथ
पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे सल्लागार संजय बारू यांनी आपल्या नव्या पुस्तकात पंतप्रधानांविषयी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
Apr 12, 2014, 09:35 AM ISTमनमोहन सिंह हे व्हॉटसअॅपसारखे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर टीका केली आहे, पंतप्रधान हे व्हॉटसअॅप सारखे असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Mar 31, 2014, 09:20 PM ISTअरे हे काय पंतप्रधान संतापले
तामिळनाडू सरकारच्या राजीव गांधी मारेक-यांच्या सुटकेच्या निर्णय़ावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आगपाखड केलीय. मुख्यमंत्री जयललिता यांचा निर्णय चुकीचा असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय. तर हा निर्णय न्यायसंगत नसल्याचीही टीका केलीय.
Feb 20, 2014, 01:43 PM ISTकाँग्रेस आमदाराच्या मुलाची दिल्लीत हत्या
अरुणाचल प्रदेशचे काँग्रेस नेत्याच्या मुलाची दिल्लीत हत्या झालीय. या हत्येच्या मॅजिस्ट्रेट तपासाचे आदेश दिल्ली पोलिसांनी दिले आहेत. नीडो तनियम या तरुणाला दक्षिण दिल्लीतल्या लाजपतनगर भागात बुधवारी काही दुकानदारांनी मारहाण केली होती, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
Feb 1, 2014, 09:36 AM ISTपंतप्रधानांसमोर तोंड दाबून `त्याला` बाहेर काढलं...
नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने गोंधळ घातला. म्हणून `त्याचं` तोंड दाबून त्याला बाहेर काढण्यात आलं.
Jan 29, 2014, 11:32 AM IST<b><font color=red>गुड न्यूजः</font></b> काँग्रेस युवराजाचा आदेश, सरकार देणार १२ सिलेंडर!
महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी एक गुड न्यूज.... सरकारने सब्सिडीच्या घरगुती सिलेंडरांची संख्या ९ वरून १२ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे.
Jan 17, 2014, 06:42 PM IST<B> <font color=red>नरेंद्र मोदी:</font></b> जनतेचे आभार, त्यांनी एका चहावाल्याला मुख्यमंत्री केलं
नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर आज भारत स्वाभिमान ट्रस्टच्या स्थापना दिवसाच्या कार्य़क्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात योगगुरु रामदेवबाबांसोबत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा उपस्थित आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका करत जनतेचे आभारही मानले आहेत.
Jan 5, 2014, 07:16 PM ISTमला तिसऱ्यांदा पंतप्रधान पद नको - मनमोहन सिंग
आम्ही अनेक देश हिताचे निर्णय घेतले आहेत. मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही. मात्र, चार राज्यांतील निवडणुकीतील पराभवाला महागाई कारणीभूत ठरू शकते. मी नवीन व्यक्तीला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. यावरून त्यांनी पंतप्रधान पद सोडण्याची तयारी दाखवून दिली आहे.
Jan 3, 2014, 11:50 AM IST