supreme court

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही- सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टानं माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणात दोषी आरोपी मुरगन, सांथन, पेरारीवलन यांनी केंद्र सरकारची फाशी देण्याची याचिका फेटाळली आहे. केंद्रानं क्यूरेटिव्ह पेटिशन दाखल करून फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याच्या निर्णयाचा विरोध करत याचिका केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळलीय. 

Jul 29, 2015, 04:39 PM IST

फाशीच्या दहशतीनं याकूब घाबरला, याकूबला अन्न-पाणी गोड लागेना

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबच्या दयेची याचिका फेटाळली, आता राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळला.त्यामुळे याकूब मेमनला फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे.

Jul 29, 2015, 11:48 AM IST

मुंबईचा गुन्हेगार याकूबचा कारागृहातच दफनविधी?

मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे. 

Jul 29, 2015, 10:44 AM IST

१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्ट : याकूब मेमनच्या अर्जावर उद्या सुनावणी

 मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात फाशीची शिक्षा झालेला एकमेव गुन्हेगार याकूब अब्दुक रजाक मेमन यांच्या माफीच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारी सुप्रीम कोर्टात झाली. या याचिकेवर सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे. 

Jul 27, 2015, 05:27 PM IST

व्यापमं घोटाळा : मध्य प्रदेश राज्यपालांना हटविण्याची नोटीस

देशातला बहुचर्चित व्यापम घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टानं व्यापम घोटाळ्यासंदर्भातली सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं व्यापम घोटाळ्याची आता सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे. 

Jul 9, 2015, 12:33 PM IST

अमेरिकेत समलैंगिक संबंधांना मिळाली कायदेशीर मान्यता

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. 

Jun 27, 2015, 10:57 AM IST

ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट 2015 सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित

सर्वोच्च न्यायालयाने ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट 2015 (एआयपीएमटी) आज रद्द केली असून ती पुन्हा चार आठवड्यात घेण्याचे आदेश दिलेत. सुमारे 6.30 लाख विद्यार्थ्यांना आता ही परिक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे.

Jun 15, 2015, 01:59 PM IST

गुप्तपणे फाशी देणं बंद, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

गु्न्ह्यात दोषी ठरलेल्याना आता गोपनीयपणे किंवा घाई घाईनं फाशी देता येणार नसल्याचं मत सुप्रिम कोर्टानं व्यक्त केलंय.

May 29, 2015, 09:00 PM IST