६०MP कॅमेरा असलेला शाओमीचा फोल्डेबल स्मार्टफोन पाहिलात का?

Mi MIX 4 असे या स्मार्टफोनचं नाव आहे.

Updated: Apr 14, 2019, 04:08 PM IST
६०MP कॅमेरा असलेला शाओमीचा फोल्डेबल स्मार्टफोन पाहिलात का? title=

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षात सॅमसंग, हुआवे आणि शाओमी कंपनीकडून फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. शाओमीने आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनबाबत काही नवीन खुलासे केले आहेत. शाओमीचा स्मार्टफोन पुढील सहा महिन्यांमध्ये लॉन्च करणार असल्याची शक्यता आहे. Mi MIX 4 असे या स्मार्टफोनचं नाव आहे. फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ६० मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असल्याची माहिती आहे. 

या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ चिपचा वापर करण्यात येणर आहे. तर १० जीबी रॅम असणार आहे. हा फोन MIUI १० वर आधारित अॅन्ड्रॉइड ९ पाय वर काम करेल. फोल्डेबल असताना स्मार्टफोन ६.५ इंची तर अनफोल्ड केल्यानंतर टॅबच्या रुपात १० इंची इतका असणार आहे. 

foldable smartphone Xiaomi Mi Mix 4 may having 60 MP camera

गेल्या काही दिवसांपूर्वी सॅमसंग, हुआवे कंपनीच्या फोल्डेबल स्मार्टफोनबाबत काही खुलासे करण्यात आले होते. त्यानुसार सॅमसंगच्या फोनची किंमत १.४ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर हुआवेच्या फोनची किंमत १.८ लाखांपासून सुरू होऊ शकते. बाजारात आपली पकड कायम ठेवण्यासाठी शाओमीचा फोल्डेबल स्मार्टफोन सॅमसंग आणि हुआवेच्या तुलनेत अतिशय स्वस्त असणार आहे. शाओमीच्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत ७० हजार रूपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शाओमीचा स्मार्टफोन सॅमसंग आणि हुआवेच्या स्मार्टफोनला बाजारात कशी टक्कर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

<