IPhone 14 Series : 2022 हे वर्ष Iphone साठी आणि आयफोन वापरणाऱ्यांची खुपं खास असणार आहे. कारण अनेकजण iPhone 14 सीरिज लाँच होण्याची वाट आतुरतेने बघत आहेत. Apple च्या या सीरिजमध्ये (Apple Series ) iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max हे स्मार्टफोन (Apple Smartfone) असणार आहेत. त्यामुळे रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, याची प्री ऑर्डर ९ सप्टेंबर पासून सुरू केली जावू शकते.
मागील कित्येक दिवसांपासून या सीरिजची (iPhone 14) चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर आयफोन 13 या सीरिजला (iPhone 13 Series) देखील ग्राहकांची चांगली पसंती मिळाली होती. कंपनीने अद्याप iPhone 14 बाबत काहीही माहिती दिली नाही. या कारणास्तव, लोक iPhone 14 च्या लॉन्च तारखेबद्दल जोरदार अनुमान लावत आहेत. या मालिकेसोबत कंपनी आपली वॉच सीरीज 8 (Apple Watch Series 8) देखील सादर करू शकते. त्याचबरोबर या इव्हेंटमध्ये Apple ची काही इतर उत्पादने देखील पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात. अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी आपली आगामी आयफोन सीरीज (iPhone series) आणि वॉच सीरीज 7 (Apple Watch Series 7) पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरच्या सुरुवातीला लॉन्च करू शकते. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कंपनी आयफोन 14 सीरीजमध्ये चार नवीन फोन लॉन्च करणार आहे.
कंपनीला iPhone 14 मध्ये 6.1-इंच स्क्रीन, iPhone 14 Max मध्ये 6.7-इंच स्क्रीन, iPhone 14 Pro मध्ये 6.1-इंच स्क्रीन आणि iPhone 14 Pro Max मध्ये 6.7-इंच स्क्रीन मिळू शकते. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, iPhone 14 मॉडेलमध्ये किरकोळ बदल दिसू शकतात. तर iPhone 14 Pro मॉडेल्समध्ये आणखी बदल केले जाऊ शकतात. या सीरिजमध्ये कॅमेरा ते प्रोसेसरपर्यंत अनेक बदल होऊ शकतात.