Mahindra Scorpio N Booking: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने Mahindra Scorpio N या मॉडेलचं बुकिंग 30 जुलैपासून सुरु केलं आहे. या मॉडेलबाबत ग्राहकांना असलेली उत्सुकता पहिल्या एका मिनिटातच दिसून आली. कंपनीने पहिले या आणि घ्या ही स्कीम सुरु केली होती. या योजनेला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या 25,000 ग्राहकांना इंट्रोडक्ट्री किमतीत ऑफर दिली होती. कंपनीची ही स्कीम पहिल्या एका मिनिटातच संपली. एका मिनिटात 25000 हजार ग्राहकांनी युनिट्स बुक केले. त्यामुळे आता इंट्रोडक्ट्री किमतीत गाडी उपलब्ध नसेल. असं असलं तरी एसयूव्ही बुकिंगचा आकडा 1 लाख यूनिट्सच्या पार गेला आहे. स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी 26 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कंपनीचं डिसेंबर 2022 पर्यंत 20 हजार युनिटचं उत्पादन करण्याचं लक्ष्य आहे.
महिंद्राने स्कॉर्पिओचे पाच व्हेरियंट बाजारात सादर केले आहेत. यात Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L मॉडेल्सचा समावेश आहे. ग्राहक आपल्या गरजेनुसार मॉडेल्स बुक करू शकतात. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन 5 जुलैपासून कार्टमध्ये येऊ शकते. कार्टमध्ये ग्राहक महिंद्रा स्कॉर्पिओ-एन प्रकार, इंधन प्रकार, सीट, क्षमता, रंग आणि डीलर निवडू शकतात. बुकिंग लवकरात लवकर व्हावे आणि ग्राहकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी हे करण्यात आले. मात्र, बुकिंग सुरू होताच एका मिनिटात 25,000 ग्राहकांनी एसयूव्हीचे बुकिंग केले होते.
कंपनीने महिंद्रा स्कॉर्पिओ एनच्या मॉडेलची किंमत 11.99 लाखापासून 21.45 लाखांपर्यंत आहे. पण इंट्रोडक्ट्री किंमत फक्त पहिल्या 25000 ग्राहकांसाठी वैध होती. आता एसयूव्ही बुक करणाऱ्या इच्छुक ग्राहकांना पूर्ण रक्कम भरावी लागेल.
Breaking records is now a habit. #MahindraScorpioN clocks over 25,000 bookings within 1 minute;
Over 1,00,000 bookings in under 30 minutes, translating into an ex-showroom value of ~₹18,000 crores pic.twitter.com/WecWLRu33n— Mahindra Scorpio (@MahindraScorpio) July 30, 2022
स्कॉर्पिओ एनमध्ये पेट्रोल आणि डिझेल असा पर्याय आहेत. यात 2.0 टर्बो पेट्रोल इंजिन आहे. ते 200 बीएचपी पॉवर आणि 270 एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिनध्ये दोन स्टेट पर्याय आहेत. त्यातील लोवर वर्जन 132 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे हायर वर्जन 175 बीएचपी पॉवर आणि 370 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहेत.