Smartphone Tips And Tricks : पावसात सर्वाधिक टेन्शन असतं ते स्मार्टफोनचं. पाऊस असो वा ऊन कामासाठी घराबाहेर तर निघावंच लागतं. पावसात फोन सुरक्षित ठेवण्यासाठी लोक फॉइल किंवा पाऊच सोबत ठेवतात. काही वेळा आपण काळजी घेतली तरी फोन मात्र ओला होऊन खराब होतोच. जर पावसात भिजून तुमचाही फोन खराब झाला असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा मोबाईल सहज ठीक करून पुन्हा तुमच्या वापरात आणू शकता.
जर तुमचा स्मार्टफोन पाण्यात भिजला तर तो लगेच बंद करा. फोनमध्ये पाणी गेल्यास शॉर्ट सर्किटही होऊ शकते. कायम लक्षात असुद्या की फोनची टेस्टिंग करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. तसेच, कोणतेही बटण दाबून तपासू नका. सर्वात आधी मोबाईल बंद करणे हेच शहाणपणाचं लक्षण आहे.
जर फोन पाण्यात किंवा पावसात भिजला असेल तर मोबाईलची बॅटरी काढून टाका, यामुळे फोनची पावर खंडित होईल. तुमच्या फोनमध्ये न काढता येणारी बॅटरी असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल थेट बंद करा. न काढता येण्यारी बॅटरी असलेल्या फोनमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची अधिक शक्यता असते. बॅटरी काढल्यानंतर तुम्ही फोनवरून फोन कव्हर, सिम कार्ड, मेमरी कार्ड काढून टाकाव. असं केल्याने शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो. सर्व सामान काढून टाकल्यानंतर ते टिश्यू पेपर किंवा वर्तमानपत्राने स्वच्छ कराव. असं केल्याने आतील ओलावा निघून जाईल.
अॅक्सेसरीज टिश्यूने साफ केल्यानंतर फोन तांदळात किमान २४ तास भाताच्या मधोमध ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. तांदूळ ओलावा लवकरात लवकर शोषून घेतो.
सिलिका जेल पॅक बहुतेक शू बॉक्स, थर्मॉसमध्ये वापरले जाते. सिलिका जेल पॅक ठेवण्याच कारण म्हणजे त्यात ओलावा येऊ नये. ते ओलावा काढून टाकतो. तुम्ही तुमचा ओला फोनही त्यात ठेवू शकता. मात्र, यामध्येही तुम्हाला तुमचा मोबाईल किमान २४ तास ठेवावं लागेल. जर तुमचा फोन ओला असेल तर तो ड्रायर किंवा हीटरमध्ये अजिबात ठेवू नका. यामुळे सर्किट खराब होऊ शकते. तसेच, फोन ऊन्हात सुकवण्याचा प्रयत्न देखील करु नये.
जर फोन ओला असेल तर त्यामध्ये हेडफोन आणि यूएसबी अजिबात कनेक्ट करू नका. यामुळे तुमचा फोन आणखी खराब होऊ शकतो. तुमचा मोबाईल चालू झाल्यानंतर आपण ते वापरू शकता. त्यानंतरही फोन ठीक होत नसेल, तर मग तो सर्व्हिस सेंटरला दाखवा.
मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ पाउच सोबत ठेवू शकता. तुम्हाला ते कोणत्याही ऑनलाइन साइटवर मिळेल. त्याची किंमत देखील फक्त 99 रुपये आहे. थोड्यासे पैसे खर्च करून तुम्ही तुमचा हजारो रुपयांचा फोन वाचवू शकता.
तुम्हाला पावसात कुठेतरी महत्त्वाच्या ठिकाणी जायचं असेल आणि मोबाईलची गरज असेल तर तुम्ही ब्लूटूथ हेडफोन वापरू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचा फोन फॉइल किंवा जाड कापडाच्या मध्ये अडकवू शकता आणि खिशात सुरक्षित ठेवू शकता. कॉल आल्यावर, तुम्ही तो ब्लूटूथ हेडफोनने रीसीव्ह करु शकाल. अनेक ब्लूटूथ हेडफोन वॉटरप्रूफ देखील असतात.