Tata Punch CNG Expected Price: तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स सीएनजी मॉडेल लवकरच लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. ग्राहकांच्या मागण्या पाहून आपल्या गाड्यांमध्ये बदल करत आहेत. टाटा मोटर्सनं नुकतीच Tiago NRG CNG भारतीय बाजारात लाँच केली होती. ही कंपनीची तिसरी सीएनजी कार होती. याआधी टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी लाँच केल्या होत्या. या गाड्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. टाटा मोटर्सचा सीएनजी पोर्टफोलिओ पाहता येत्या काही दिवसात टाटा पंच सीएनजी व्हर्जनमध्ये सादर करू शकते असं सांगितलं जात आहे. जर टाटा पंच सीएनजी व्हर्जनमध्ये तर त्याची किंमत आणि मायलेज किती असेल जाणून घेऊयात
टाटा पंच सीएनजी 2023 च्या सुरुवातीला लाँच होण्याची शक्यता आहे. याशिवाय, 2023 ऑटो एक्सपोमध्ये कंपनी पंच ईव्ही आणि पंच सीएनजीची सादर करू शकते. टाटा मोटर्सच्या सीएनजी वाहनांबाबत बोलायचं झालं तर, पेट्रोल मॉडेलपेक्षा सीएनजी मॉडेल 90 हजार रुपयांनी महाग आहेत. टाटा पंचच्या बाबतीतही असंच असू शकते. सध्या, टाटा पंच पेट्रोलच्या बेस व्हेरिएंटची किंमत 6.75 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 8.37 लाख रुपये आहे. म्हणजेच, त्याच्या सीएनजी मॉडेलची किंमत 7.65 लाख रुपयांपासून सुरू होऊन 9.27 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
बातमी वाचा- रिचार्जपेक्षा कमी किंमतीत मिळतोय Nokia चा हा स्मार्टफोन, किंमत वाचून लगेच खरेदी कराल
टाटा पंच सीएनजीमध्ये टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी मॉडेल सारखी 1.2 लीटर पेट्रोल पॉवरट्रेन मिळू शकते. टियागो, टिगोरमध्ये इंजिन सीएनजीवर असल्यास 73PS पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजी किटसह इंजिन 26.49 किमी/किलो मायलेज देते.