व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, खोट्यांची होणार पोलखोल

मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलंय. या फिचरमुळे तुम्ही आता व्हॉट्सअॅपवरुन लाईव्ह लोकेशन शेअर करू शकणार आहात. अनेक दृष्टीने हे फिचर महत्वाचं ठरणार आहे. 

Updated: Oct 18, 2017, 12:07 PM IST
व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, खोट्यांची होणार पोलखोल title=

मुंबई : मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलंय. या फिचरमुळे तुम्ही आता व्हॉट्सअॅपवरुन लाईव्ह लोकेशन शेअर करू शकणार आहात. अनेक दृष्टीने हे फिचर महत्वाचं ठरणार आहे. 

कुणी खोटं बोलत असेल, कुणी अडचणीत असेल, तुम्ही कुठे आहात यावर कुणाचा विश्वास बसत नसेल तर हे फिचर फायद्याचं ठरणार आहे. तुमच्या खाजगी आणि ग्रुप चॅटमध्येही तुम्ही हे लाईव्ह लोकेशन कोणालाही पाठवू शकणार आहात. 

व्हॉट्सअॅपवरुन याआधीही लोकेशन शेअर करता येत होतं. मात्र त्याद्वारे लाईव्ह लोकेशन कळत नव्हतं. पण व्हॉट्सअॅपने आता त्यापुढेही मजल मारुन Live Location शेअरिंग फिचर अॅड केलं आहे.

हे फिचर कसं करतं काम?

यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅटमध्ये जाऊन, Attach वर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला लोकेशनचा पर्याय दिसेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कालावधी विचारला जाईल. तो आपल्या सोईनुसार निवडा. लाईव्ह लोकेशन तुम्ही म्यॅनुअली बंद करु शकता.