मुंबई : Xiaomi या लोकप्रिय मोबाईल कंपनीने किर्तीमान रचला आहे. शाओमीचा Redmi 9A हा जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन ठरला आहे. काउंटरपॉइंट रिसर्च ग्लोबल हॅंडसेट मॉडल ट्रॅकरने (Counterpoint Research Portal) आपल्या रिपोर्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे. या रिपोर्टनुसार 2021 च्या पहिल्या तिमाहीत Xiaomi Redmi 9A हा जगात सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन ठरला आहे. तर रेवेन्यूच्या बाबतीत सॅमसंग गॅलेक्सी S21 अल्ट्रा 5G ने बाजी मारली आहे. रेडमी 9A हा स्मार्टफोन 2020 मध्ये 'देश का स्मार्टफोन' या टॅगलाईनने लॉन्च करण्यात आला होता.(xiaomi redmi 9a highest selling android phone)
Redmi 9A स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री कुठे?
चीन आणि भारतात Redmi 9A ची सर्वाधिक विक्री करण्यात आली. तर दक्षिण आशिआई मार्केटमध्येही Redmi 9चा जलवा पाहायला मिळाला. Redmi 9A, Redmi 9A आणि Redmi Note 9 ला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी मोठ्या प्रमाणात या मोबाईलची खरेदी केली. त्यामुळे शाओमी जागितक स्तरावर 150 डॉलरच्या (11 हजार रुपये) किंमतीत अव्वल क्रमांकावर राहिली.
Xiaomi Redmi 9A चे फिचर्स आणि किमंत
भारतात शाओमीचा Redmi 9A हा स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लॉन्च करण्यात आला. तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 रुपये इतकी होती. या मोबाईलमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत ही 7 हजार 499 इतकी आहे. हा मोबाईल MediaTek Helio G25 octa-core प्रोसेसरवर आधारित आहे.
या मोबाईलचा 6.53 इंच इतका HD+ TFT-IPS डिस्प्ले आहे. या मोबाईलची बॅटरी 5000mAh इतकी आहे. विशेष म्हणजे फास्ट चार्जिंग हे या मोबाईलचे वैशिष्ट्य आहे. या स्मार्टफोनला 10W के फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा हा 5 मेगापिक्सल तर रियर कॅमेरा 13 मेगापिक्सल इतका आहे.