मुंबई : मुलांना युट्युबवर चुकीचा कंटेंट दिसू नये यासाठी गुगल खूप आधीपासून काम करत आहे. अलिकडेच कंटेंट वादानंतर गुगलने व्हिडिओ प्लेटफार्म वर नव्या फिचर्सची घोषणा केली आहे. यात पालकांना मुले बघत असलेले चॅनल्स आणि व्हिडिओज नियंत्रित करण्याची अनुमती मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी चाईल्ड सेफ्टी ऑर्गनाइजेशन ग्रुप्सने US फेडरल ट्रेड कमीशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. युट्युब किड्स प्लेटफार्मच्या माध्यमातून मुलांचा टेडा कलेक्ट केला जात आहे.
युट्युब किड्स अॅपसोबत कंटेंट वाद समोर आला होता. यात conspiracy थियोरी व्हिडिओच्या जागी दुसरे कंटेंटचा सल्ला देण्यात येत आहे. बिजनेस इनसाईडरच्या रिपोर्टनुसार, मून लेंडिंगचा व्हिडिओ सर्च केल्यावर दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. कारण व्हिडिओ प्लेटफार्मवरून व्हिडिओज हटवण्यात आले आणि अॅपच्या माध्यमातून काही चॅनल्सही ब्लॉक करण्यात आले.
या महिन्याच्या सुरुवातील युट्युबने लहान मुलांच्या अॅपवर कंटेंट नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. आता या अॅपमध्ये बदलही करण्यात येत आहे. यामध्ये पालक कंटेंट स्वीकारु शकतात आणि अॅपमध्येही सर्च ऑप्शन बंद करु शकतात. त्याचबरोबर सजेस्डेट व्हिडिओज फक्त ठराविक चॅनल्ससाठी असतील. जे इंटरनल टीमद्वारा तपासण्यात येतील.