चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या छोट्याशा येरवागात दारुबंदीसाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. या गावानं अवैध दारुविक्री रोखण्यासाठी दारुविक्रेत्यांना शासकीय दाखले देणं तसंच सरकारी योजनांचा लाभ देणंच बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
अवैध दारु विक्रेत्याना रहीवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले किंवा ग्राम पंचायतीमार्फत जे दाखले देण्यात येतात, असे कोणतेही दाखले न देण्याचा निर्णय घेतल्यानं या दारु विक्रेत्यांना मोठा फटका बसणार आहे. येरगाव ग्रामसभेतच हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे येरवागच जिल्हाभरात कौतूक होतंय.