मुंबई : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी यंदा तब्बल २९ हजार ५७१ करोड रूपयांचे दान केले आहे.
त्यांनी नुकतेच मायक्रोसॉफ्टचे ६ करोड ४० लाख शेअर्स दान केले आहेत. पण हे दान नेमके कुणाले झाले आहे याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे.
बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी एकत्र 'बिल अॅन्ड मेलिंडा फाऊंडेशन'ची स्थापना केली आहे. गेट्स दांपत्य परोपकाराच्या कार्यासाठी ही फाऊंडेशन चालवतात. त्यामुळे प्रामुख्याने दान याच फाऊंडेशनमध्ये केले जाते.
यंदा बिल गेट्स यांनी केलेले दान हे सर्वाधिक आहे. १९९९ साली बिल गेट्स यांनी १६ अरब डॉलर्स म्हणजेच सुमारे १ करोड रूपयांचे दान केले होते. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या ६ करोड ४० लाख शेअर्सचे दान हे आत्तापर्यंतचे बिल गेट्सचे सर्वाधिक दान ठरले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये बिल गेट्स हे नाव अग्रस्थानी आहे. संपत्ती दान करूनही बिल गेट्स हेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहणार आहेत.