मुंबई : एका हॉस्पीटलमध्ये आपल्या मुलावर पाकिस्तानी डॉ़क्टरकडून उपचाराला नकार देणाऱ्या एका कॅनडियन महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला दिसतोय.
हितेश भारद्वाज नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडिओ शूट केलाय. ही धक्कादायक घटना घडली तेव्हा तो घटनास्थळी उपस्थित होता.
ऑन्टारिओच्या 'मिसिसॉगा वॉक इन हॉस्पीटल'मध्ये हा वर्णवाद पाहायला मिळाला.
'माझ्या मुलाच्या छातीत दुखतंय... आणि तुम्ही म्हणताय या हॉस्पीटलमध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकही 'व्हाईट' डॉक्टर उपलब्ध होणार नाही... मी इथे एकही गोरा, ज्याचे लाल दात नसतील आणि इंग्रजी बोलता येत असेल असा डॉक्टर पाहू शकत नाही?' असं म्हणत या महिलेनं हॉस्पीटल डोक्यावर घेतलेलं या व्हिडिओत पाहायला मिळतंय.