वुहान : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. दुस-या दिवशी मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग वुहानच्या ईस्ट लेकवर फेरफटका मारला. यावेळी मोदी आणि जिनपिंग यांच्यातील संवाद भारत-चीनसह सा-या जगानं पाहिला. यावेळी या दोन्ही नेत्यांनी चाय पे चर्चा केली.
या दोघांमध्ये द वर्ल्ड इकॉनॉमी या विषयावर चर्चा झाली. यानंतर मोदी आणि जिनपिंग यांनी ईस्ट लेकवर बोटीनं सैर केली. या दोन्ही नेत्यांमधील अनौपचारिक बैठकींची सुरुवात 2014 सालापासून झाली होती. भारत दौ-यावर आलेल्या शी जिनपिंग यांना मोदी साबरमतीला घेऊन गेले होते. इथं त्यांनी बोटींगचा आनंदही घेतला होता.
त्याचीच परतफेड जिनपिंग यांनी मोदी यांना बोटीची सैर करत घडवल्याचे बोललं जातंय. या ऐतिहासिक भेटीत मोदी आणि जिनपिंग यांच्यात दहशतवाद, डोकलाम या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिलीय.