लंडन : कोरोना विषाणूचा (Coronavirus) जगभरात कहर सुरूच आहे. या दरम्यान, नवीन समस्या समोर येत आहेत. शास्त्रज्ञांसमोर कोरोनासाठी रामबाण उपचार शोधणे एक आव्हान उभे आहे. आता एक नवीन विषाणू दाखल झाला आहे. हा नवीन विषाणू देखील खूप धोकादायक आहे, या विषाणूचे नाव मंकीपॉक्स (Monkeypox) आहे. हा विषाणू घरी राहणाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
ब्रिटनमधील वेल्समध्ये मंकीपॉक्स (Monkeypox) दोन प्रकरणे आढळली आहेत. वैज्ञानिकांच्या मते हा विषाणू बहुधा आफ्रिकेत आढळतो. खास गोष्ट म्हणजे ज्या लोकांमध्ये हा नवीन विषाणू ओळखला गेला आहे, ते दोघेही घरीच राहायचे. आपण घराबाहेर जात नसलो तरी हा विषाणू आपल्याला पकडू शकतो. यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. तज्ज्ञांच्या मते हा नवीन विषाणू नाही तर खूप जुना व्हायरस आहे.
तथापि, ब्रिटिश वृत्तपत्र ‘द वीक’च्या वृत्तानुसार असे म्हटले जात आहे की, दोन्ही संसर्गग्रस्त व्यक्तींना युकेच्या बाहेर संसर्ग झाला आहे. त्यांना घरात संसर्ग झालेला नाही. इंग्लंडमधील आरोग्य यंत्रणा तात्काळ कामाला लागलीआहे. त्यांनी यांच्या संपर्कात आलेल्यांचे शोध सुरु केला आहे. येथील आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
तज्ज्ञांच्या मते, या विषाणूच्या दोन प्रजाती आहेत, पश्चिम आफ्रिकन आणि मध्य आफ्रिकन. हा विषाणू मुख्यत: मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या दुर्गम भागात, उष्णकटिबंधीय जंगलांजवळ पसरतो. मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणू स्मॉलपॉक्स विषाणूंसारखा आहे.
शास्त्रज्ञांच्या मते संसर्गाची शक्यता कमी आहे. जरी या आजारात मृत्यूची संख्या 11 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. चांगली गोष्ट म्हणजे लहानपणीपासून संरक्षण करणारी लसदेखील स्मॉलपॉक्स विरूद्ध प्रभावी आहे.
मंकीपॉक्स विषाणूच्या बाबतीत सांगायचे म्हणजे लक्षणे दिसण्याच्या सुरुवातीला ताप येतो. त्यानंतर डोकेदुखी, सूज येणे, पाठदुखी, स्नायू कडक होणे आणि वेदना होणे ही सुरुवात आहे. यात चिकनपॉक्ससारख्या पुरळ देखील आहे. यामुळे ताप येतो. नंतर चेहर्यावर पुरळ तयार होतो. मॉंकीपॉक्स विषाणू 14 ते 21 दिवस जिवंत राहतो.