दुबई : जगातील सर्वात उंच इमारती जवळ असलेल्या एका इमारतीला आज लागली. बुर्ज खलिफा जवळ ही 35 मजली इमारत आहे. 7 नोव्हेंबर रोजी इमारतीला ही भीषण आग लागली होती. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पण या घटनेचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे. ज्या इमारतीला आग लागली ती इमार स्कायस्क्रॅपर म्हणून ओळखली जाते.
आग लागल्यानंतर इमारतीत उपस्थित असलेल्या लोकांना वाचवण्यात यश आलं. सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पण या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही आग कशी लागली याबाबत अजून तरी दुबई पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण यामुळे उंच इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
#Dubai Skyscraper Fire: A massive fire broke out at a skyscraper, Emaar tower, near #BurjKhalifa.
As per reports, there have been no casualties & the fire has been doused | WATCH pic.twitter.com/ILhgoFub0Z
— Mirror Now (@MirrorNow) November 7, 2022
दुबईमध्ये अनेक उंच इमारती आहे. त्याच दुबईची ओळख देखील आहेत. जगभरात उंच इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. एप्रिल 2022 दरम्यान बुर्ज खलिफाच्या समोर असलेल्या हॉटेलमध्ये आग लागली होती. 2015 मध्ये ही अॅड्रेस डाउनटाउन हॉटेलला आग लागली होती. हे हॉटेल देखील बुर्ज खलिफाच्या जवळ आहे.