Video : तब्बल 418.42944 किमी दुरून आल्या दिवाळीच्या शुभेच्छा; सुनीता विलियम्सचा अंतराळातून तुमच्यासाठी खास मेसेज

Sunita Williams special message from space wishing happy Diwali : दिवाळीच्या शुभेच्छा देत सुनीता विलियम्स थेट अवकाशातून तुमच्या भेटीला...   

सायली पाटील | Updated: Oct 29, 2024, 09:56 AM IST
Video :  तब्बल 418.42944 किमी दुरून आल्या दिवाळीच्या शुभेच्छा; सुनीता विलियम्सचा अंतराळातून तुमच्यासाठी खास मेसेज title=
nasa Sunita Williams special message from space wishing happy Diwali from 260 miles watch Video

Sunita Williams special message from space wishing happy Diwali : भारतीय वंशाच्या नासाच्या (NASA) महिला अंतराळवीर सुनीता विलियम्स या त्यांच्या मोहिमेदरम्यान गेले कैक महिने अवकाशातच मुक्कामी आहेत. पृथ्वीवर त्यांचा परतीचा प्रवास अवघ्या काही दिवसांत अपेक्षित असतानाच यानातील तांत्रिक बिघाडामुळं हा मुक्काम वाढला. ISS अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह मुक्काम ठोकला. 

वाढदिवस असो किंवा इतर कोणते सणवार, अगदी दिवाळीसुद्धा सुनीता विलियम्स अवकाशातच साजरा करताना दिसत आहे. जवळपास मागील पाच महिने अंतराळात असणाऱ्या विलियम्स यांचा एक व्हिडीओ नुकताच जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना दिवाळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिवाळी म्हणजे आनंद आणि आठवणी, विलियम्स यांच्या या व्हिडीओतून याचीच अनुभूती होत आहे. कारण, त्यांनी या व्हिडीओतून अगदी वडिलांपासून मित्रपरिवारापर्यंत सर्वांचाचा उल्लेख केला आहे. पृथ्वीपासून तब्बल 260 मैल दूरवरून दिवाळी अनुभवण्याचा अनुभव भारावणारा असल्याचंही त्यांनी इथं सांगितलं. 

दिवाळीच्या शुभेच्छा देताना विलियम्स यांनी वडिलांच्या प्रयत्नांना दाद देत परदेशातही संस्कृती जपण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला अधोरेखित केलं. दिवाळी आणि इतर भारतीय सण साजरा करत हा वारसा जपण्याची शिकवण वडिलांनी दिल्याचंही त्या म्हणाल्या. 

सुनीता विलिम्स नेमकं काय म्हणाल्या?  पाहा... 

हेसुद्धा वाचा : 'कोई नही बचेगा...' Mumbai विमानतळावर 'काळ्या जादू'चं सावट? एकच खळबळ 

 

दरम्यान, यंदाच्याच वर्षी जून महिन्यापासून सुनीता विलियम्स आणि मोहमेत त्यांच्यासोबत अंतराळात गेलेल्या बुच विल्मोर यांना अवकाशात पाच महिन्यांचा काळ लोटला आहे. स्पेसएक्सनं क्र्यू 9 मोहिम लाँच करुनही सध्यातरी फेब्रुवारी 2025 पूर्वी कोणताही अंतराळवीर पृथ्वीवर परतण्याची शक्यता अतिशय धुसर असल्याचच सांगितलं जात आहे.