मॉस्को : नाटो सदस्य राष्ट्र होण्यावरून युक्रेनने माघार घेतली आहे. नाटो (NATO) चा सदस्य होण्यात आता रस नाही असं युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी म्हटलंय. युक्रेन नाटोचा सदस्य होणार असल्यामुळेच रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता.
रशियाने निर्माण केलेल्या डोनेट्स्क आणि लुहान्स्क या दोन देशांबाबतही तडजोड करण्यास आपण तयार आहोत असं देखील झेलेन्स्की यांनी म्हटलंय. नाटो युक्रेनला सदस्य करून घेण्यास तयार नसल्याचं आम्हाला आधीच समजलं होतं असा दावा त्यांनी केलाय.
रशियाशी दोन हात करण्यास आणि वादग्रस्त मुद्द्यांना तोंड देण्यास नाटो तयार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे जागतिक युद्धात रूपांतर होण्याची भीती अनेक देशांना आहे. युद्धामुळे अनेक देशांचे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारत आपल्या नागरिकांच्या परतीसाठी ऑपरेशन गंगा चालवत आहे.
रशियाचे हल्ले ताबडतोब थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली आहे. युक्रेनने रशियाच्या आक्रमणाविरोधात हेग येथील संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात धाव घेतली आहे. (Ukraine has called on the International Court of Justice to intervene immediately to stop Russia's attacks)
न्यायालयाचे अध्यक्ष असलेले अमेरिकन न्यायाधीश जोआन डोनोग यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी नेदरलँड्सच्या रशियन राजदुतांनी आपल्या देशाला तोंडी सुनावणीमध्ये रस नसल्याचे न्यायालयाला कळवले आहे. त्यामुळे रशियाच्या अनुपस्थितीत खटल्याचे दोन दिवसांचे कामकाज सुरू झाले होते.